World Cup 2019 : कॅप्टन विराट कोहलीचा हा फोटो पाहिलात का ?

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या सामन्यावर पावसाचे सावट होते

Updated: Jun 18, 2019, 09:08 PM IST
World Cup 2019 : कॅप्टन विराट कोहलीचा हा फोटो पाहिलात का ? title=

मँचेस्टर : टीम इंडियाने वर्ल्डकपमध्ये रविवारी (16 जून) पाकिस्तानचा पराभव केला. टीम इंडियाचा हा यंदाच्या वर्ल्डकपमधील तिसरा विजय ठरला. या विजयानंतर कॅप्टन विराट कोहलीने ट्विटरवर आपल्या लहाणपणीचा आणि पाकिस्तान विरुद्धच्या मॅचदरम्यानचा फोटो शेअर केला आहे. 

 

 

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या सामन्यावर पावसाचे सावट होते. पावसामुळे काही मिनीटे खेळ थांबवावा लागला. यादरम्यान विराट कंबरेवर हात ठेऊन आकाशाकडे पाहतानाचा हा फोटो आहे. 

विराटने या फोटोसोबत लहानपणीचा मिळता जुळता फोटो एकत्रित करुन ट्विट केला आहे. 'हे सर्व मी ९० च्या दशकापासून करतोय' असे कॅप्शन विराटने या ट्विटला दिले आहे. दरम्यान हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

विराट कामगिरी

विराट कोहलीने पाकिस्तान विरुद्ध दमदार अर्धशतकी कामगिरी केली. विराटने यात  ६५ बॉलमध्ये ७७ रन केल्या. यात त्याने ७ फोर लगावले. 

दरम्यान टीम इंडियाची पुढील मॅच शनिवारी (२२ जून) अफगाणिस्तान विरुद्ध होणार आहे.