मुंबई : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया टीमची घोषणा करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने १५ खेळांडूची ऑस्ट्रेलियन टीम जाहीर केली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेला ३० मे पासून इंग्लंड मध्ये सुरुवात होत आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने घेतलेल्या एका निर्णयाने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ऑस्ट्रेलियन निवड समितीने पीटर हॅण्डसकोम्ब आणि जोश हेझलवूडला टीममध्ये स्थान न दिल्याने सर्वांनाच अनपेक्षित धक्का लागला आहे. ऑस्ट्रेलियन टीममध्ये स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरला स्थान देण्यात आले आहे. बॉलसोबत छेडछाड केल्या प्रकरणी या दोघांवर बंदी घालण्यात आली होती. यानंतर बंदी उठवल्यानंतर त्यांना टीममध्ये स्थान देण्यात आले आहे.
Here's the Aussie squad out to defend their World Cup title!
More HERE: https://t.co/hDu02GtIWF #CWC19 pic.twitter.com/iRzjLWNGeZ
— cricket.com.au (@cricketcomau) April 15, 2019
एरॉन फिंच (कॅप्टन)
जेसन बेहरनडॉर्फ
एलेक्स कॅरी (विकेटकीपर)
नॅथन कॉल्टर-नाइल
पॅट कमिन्स
उस्मान ख्वाजा
नेथन लॉयन
शॉन मार्श
ग्लेन मॅक्सवेल
झाय रिचर्डसन
स्टीव्ह स्मिथ
मिचेल स्टार्क
मार्कस स्टॉयनिस
डेव्हि़ड वॉर्नर
एडम झॅम्पा
ऑस्ट्रेलियाच्या बॉलिंगची धुरा ही पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन कॉल्टर-नाइल, जॉय रिचर्डसन आणि जेसन बेहरनडॉर्फ यांच्यावर असणार आहे. तसेच फिरकीची बाजू नेथन लॉयन आणि एडम झॅम्पा यांच्याकडे असणार आहे.
वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय टीमची निवड आज होणार आहे. भारतीय टीममध्ये जवळपास १३ खेळाडूंची संधी मिळणार असल्याचे नक्की आहे. तर फक्त २ जागांसाठी कोणाला संधी देण्यात येणार आहे, हे म्हत्वाचे ठरणार आहे.
उर्वरित २ जागांसाठी तगडी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. २ जागांसाठी कोणाला स्थान द्यायचे असा पेच निवड समितीपुढे नक्कीच उभा असणार आहे. टीममध्ये एक अतिरिक्त विकेटकीपर, चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार, ऑलराऊंडर खेळाडू आणि जादाचा फास्टर बॉलर अशा चार प्रकारचे खेळाडू आहेत. पण यापैकी फक्त दोघांनाच संधी मिळणार आहे. त्यामुळे टीममध्ये कोणाला स्थान मिळणार आहे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दुपारी निवड समितीच्या बैठकीनंतर भारतीय टीम जाहीर करण्यात येईल.