VIDEO : सुषमा वर्माचा अवतार पाहून आठवेल, गंभीरने कशी लावली होती वॉटसनची वाट

 ऑस्ट्रेलियाने आयसीसी महिला वर्ल्डकपमध्ये बुधवारी भारताला आठ विकेटने पराभूत केले. पण यात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा रडीचा डाव पाहाला मिळाला. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jul 14, 2017, 05:23 PM IST
  VIDEO : सुषमा वर्माचा अवतार पाहून आठवेल, गंभीरने कशी लावली होती वॉटसनची वाट title=

 नवी दिल्ली :  ऑस्ट्रेलियाने आयसीसी महिला वर्ल्डकपमध्ये बुधवारी भारताला आठ विकेटने पराभूत केले. पण यात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा रडीचा डाव पाहाला मिळाला. 

 ऑस्ट्रेलियाची गोलंदाज एलिस पॅरीने टीम इंडियाची विकेट किपर फलंदाज सुषमा वर्माला रन घेताना रोखण्यासाठी तिच्या समोर उभी राहिली. पण सुषमाने समझदारीने आणि बहादुरीने याचा सामना केला.  त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

पेरी रस्त्यात आल्यावर सुषमाने समझदारी दाखवली आणि पहिली धाव पूर्ण न करता तिने दुसरी धाव घेतली.  यावेळी तिला एकच धाव मिळाली पण स्ट्राइक तिच्याकडे आली. 

 

रन घेताना वॉटसन हा नेहमी गंभीरच्या रस्त्यात येत होता. त्यामुळे गंभीराला अडचण येत होती, मग चूप राहणारा तो गंभीर कुठे त्याने पळताना वॉटसनला कोपराने मारले. आयसीसीने गंभीरला दोषी ठरवून त्याला एक सामन्याची बंदी घातली आणि मॅच फीमधील १० टक्के भाग कट केला.