Womens T20 Asia Cup 2022: वुमन्स टी 20 आशिया कप 2022 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि थायलँड या संघांनी धडक मारली आहे. साखळी फेरीच्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ आघाडीवर राहिले. भारताने 6 पैकी 5 सामने जिंकले आणि 10 गुणांसह नेट रनरेट +3.141 इतका आहे. भारत गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. दुसरीकडे पाकिस्ताननं 6 पैकी 5 सामने जिंकले आणि 10 गुणांसह नेट रनरेट +1.806 इतका आहे. पाकिस्तान गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. तर श्रीलंका आणि थायलँड अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.
उपांत्य फेरीचे सामने 13 ऑक्टोबर रोजी खेळले जाणार आहे. भारत विरुद्ध थायलँड आणि पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार भारत विरुद्ध थायलँड सामना 13 ऑक्टोबरला सकाळी 8.30 वाजता असणार आहे. तर पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामना दुपारी 1 वाजता असणार आहे. उपांत्य फेरीचे सामने झाल्यानंतर अंतिम सामना 15 ऑक्टोबरला होणार आहे.
T20 World Cup : ना भारत ना न्यूझीलंड, युनिव्हर्सल बॉस म्हणतो, 'हे' 2 संघ फायनल खेळणार!
भारतीय महिला संघ: दयालन हेमलथा, जेमिमाह रॉड्रिक्स, किरण नवगिरे, सब्भीनेनी मेघना, शफाली वर्मा, स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा, हरमनप्रीत कौर, पूजा वस्राकार, स्नेह राणा, रिचा घोष, तानिया भाटिया, मेघना सिंह, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंह, सिम्रन बहादूर