IND-W vs PAK-W : मोबाईलवर पाहा फ्रीमध्ये Ind Vs Pak Live T20 सामना; फक्त करा ‘हे’ काम

Asia Cup 2022: टॉस जिंकत पाकिस्तानची प्रथम फलंदाजी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेवन, तुम्ही तो कुठे विनामूल्य पाहू शकता त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या...

Updated: Oct 7, 2022, 02:46 PM IST
IND-W vs PAK-W : मोबाईलवर पाहा फ्रीमध्ये Ind Vs Pak Live T20 सामना; फक्त करा ‘हे’ काम  title=

Wome Asia Cup 2022 : सध्या सुरू असलेल्या महिला आशिया चषक 2022 च्या 13व्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले आहेत. हा सामना आज (7 ऑक्टोबर) सिल्हेटमधील सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरू आहे. सध्या टीम इंडिया (team India) ग्रुप अव्वल स्थानावर आहे. तर पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही संघ कप जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार आहेत आणि या सामन्यात विजय मिळवून त्यांची विश्वासार्हता मजबूत करू शकतात.

भारताने आत्तापर्यंतचे तिन्ही सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानला गेल्या वेळी थायलंडकडून पराभव पत्करावा लागला आहे. हा सामना किती वाजता खेळला जाईल आणि तुम्ही तो कुठे विनामूल्य पाहू शकता याबाबत सविस्तर जाणून घ्या...

पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या शफाली वर्मा आणि किरण नवगिरे या दोघींना अंतिम अकरातून वगळले आहे. तर स्नेह राणाच्या जागी राधा यादवची संघात एंट्री झाली आहे. पाकिस्ताननेही दोन बदल केले आहेत. कायनात इम्तियाज आणि डायना बेग यांच्याजागी आयमान अन्वर आणि सादिया इक्बाल यांची अंतिम अकरामध्ये निवड केली आहे.

India W vs Pakistan W: सामना कधी सुरू होईल?

महिला आशिया चषक 2022 मधील भारत विरुद्ध पाकिस्तान 07 ऑक्टोबर 2022 (आज)  सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, अकादमी मैदानावर खेळला जाईल. IND-W विरुद्ध PAK-W क्रिकेट सामन्याची नियोजित वेळ भारतीय वेळेनुसार दुपारी 1:00 आहे.

India Vs Pakistan Live Streaming: Where to watch

Asia Cup भारतातील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केला जाईल.  Disney+Hotstar इव्हेंटचे ऑनलाइन कव्हरेज प्रसारित करेल.  अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, मालदीव, नेपाळ आणि श्रीलंका सारख्या अन्य उपखंडातील आशिया चषक 2022 प्रमाणेच नेटवर्क कव्हरेज पाहता येणार आहे. 

India Vs Pakistan Live Streaming: Free मध्ये कसे पाहाल?

जिओ वापरकर्त्यांनी काय करावे-

तुम्ही जिओ वापरकर्ते असल्यास एका प्लॅनसह Disney+Hotstar एका वर्षासाठी मोफत घेऊ शकता. जिओ 499 रुपयांचा प्रीपेड प्लॅन आणते ज्यामध्ये 28 दिवसांची वैधता उपलब्ध आहे आणि दररोज 2 GB डेटा ऑफर केला जातो. Disney+Hotstar ला या प्लॅनसह सदस्यता देखील मिळते.

 वाचा : तुमच्या दारात अचानक रोबोट आला तर घाबरू नका, Pizza पोहोचविणारा Delivery Boy असेल 

Airtel वापरकर्त्यांनी काय करावे-

जर तुम्ही Airtel यूजर असाल तर तुम्ही 399 रुपयांचा प्लान निवडू शकता. याची वैधता 28 दिवस आहे आणि दररोज 2.5GB डेटा उपलब्ध आहे. या प्लॅनसह, तुम्हाला तीन महिन्यांचे Disney + Hotstar सदस्यत्व मिळेल.

Vi वापरकर्त्यांनी काय करावे-

जर तुम्ही Vi वापरकर्ता असाल तर 499 रुपयांची योजना सर्वोत्तम आहे. तसेच त्याची वैधता 28 दिवसांची आहे. 2G डेटा दररोज दिला जातो. Disney+Hotstar सबस्क्रिप्शन वर्षभरासाठी उपलब्ध असणार आहे. 

दोन्ही संघाची प्लेईंग इलेवन

भारतीय महिला संघ:  स्म्रीती मंधाना, सभिनेनी मेघना, जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दयालन हेमलता, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, रेणुका सिंग, राधा यादव आणि राजेश्वरी गायकवाड.

पाकिस्तान महिला संघ: मुनीबा अली (विकेटकीपर), सिद्रा अमीन, बिस्माह मारूफ (कर्णधार), निदा दार, आयेशा नसीम, आलिया रियाझ, ओमामा सोहेल, आयमान अन्वर, तुबा हसन, सादिया इक्बाल आणि नशरा संधू.