AUS vs SA T20 World Cup Final: ऑस्ट्रेलियाच्या महिलांनी रचला इतिहास; सहाव्यांदा कोरलं वर्ल्डकपवर नाव

Women T20 World Cup 2023: महिला टी-20 वर्ल्डकपची आज फायनल ऑस्ट्रेलिया विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये रंगली होती. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इतिहास रचत सहाव्यांदा ICC T20 महिला वर्ल्डकप जिंकला आहे. 

Updated: Feb 26, 2023, 10:18 PM IST
AUS vs SA T20 World Cup Final: ऑस्ट्रेलियाच्या महिलांनी रचला इतिहास; सहाव्यांदा कोरलं वर्ल्डकपवर नाव title=

Women T20 World Cup Final AUS vs SA : महिला टी-20 वर्ल्डकपची आज फायनल ऑस्ट्रेलिया विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये रंगली होती. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इतिहास रचत सहाव्यांदा ICC T20 महिला वर्ल्डकप जिंकला आहे. केपटाऊनमध्ये झालेल्या फायनल सामन्यात कागारूंच्या महिलांनी दक्षिण आफ्रिकेचा 19 रन्सने पराभव केला. यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या महिलांकडे इतिहास रचण्याची संधी होती, मात्र त्यांना या संधीचं सोनं करता आलं नाही.

ऑस्ट्रेलियाकडून 157 रन्सचं टारगेट

ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेच्या महिलांना 157 रन्सचं टारगेट दिलं होतं. या टारगेटचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या टीमची ओपनर लॉरा वोल्वार्डने उत्तम फलंदाजी केली. तिने 48 बॉल्समध्ये 5 फोर आणि 3 सिक्ससह 61 रन्स केले. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या महिलांना 6 विकेट्स गमावत केवळ 137 रन्स करता आले.

बेथ मुनीची उत्कृष्ट कामगिरी

ऑस्ट्रेलिया टीमची ओपनर बेथ मुनीने सर्वोत्तम खेळ करत हाफ सेंच्युरी झळकावली. तिच्या या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात 6 विकेट्स गमावून 156 रन्स केले. मुनीने 53 बॉल्समध्ये 9 फोर आणि एका सिक्ससह नाबाद 74 रन्स केले. मुनीने एलिसा हिली सोबत 36 रन्सची पार्टनरशिप केली. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेकडून शबनम इस्माईलने 26 तर मारिजन कॅपने 35 रन्स देत प्रत्येकी 2-2 विकेट पटकावल्या.

ऑस्ट्रेलियाच्या महिलांनी रचला इतिहास

ऑस्ट्रेलियाच्या महिला टीमने यापूर्वी 2010, 2012, 2014, 2018 तसंच 2020 मध्ये चॅम्पियन बनल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या टीमने दुसऱ्यांदा महिला टी-20 वर्ल्डकपमध्ये विजेतेपदाची हॅट्ट्रिक केलीये. यापूर्वी कांगारूंच्या टीमने 2010, 2012 आणि 2014 मध्ये सलग तीन वेळा विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर दुसऱ्यांदा आता 2018, 2020 आणि 2023 मध्ये विजेतेपद पटकावलंय.