राहुल द्रविडच्या शिष्याला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये संधी?

टी-२० आणि वनडे सीरिजनंतर आता भारत आणि इंग्लंडमधल्या ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात होणार आहे. 

Updated: Jul 22, 2018, 07:17 PM IST
राहुल द्रविडच्या शिष्याला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये संधी? title=

लंडन : टी-२० आणि वनडे सीरिजनंतर आता भारत आणि इंग्लंडमधल्या ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात होणार आहे. १ ऑगस्टला पहिली टेस्ट मॅच होणार आहे. या मॅचमध्ये विराट कोहली कोणत्या खेळाडूंना संधी देणार हे पाहणं औत्स्युकाचं ठरणार आहे. पण या मॅचआधीच भारतीय ए टीमचा प्रशिक्षक राहुल द्रविडनं ऋषभ पंतचं कौतुक केलं आहे. नुकत्याच झालेल्या भारत ए आणि इंग्लंड ए या सीरिजमध्ये पंतनं चांगली कामगिरी केली. यानंतर राहुल द्रविडनं बीसीसीआयला मुलाखत दिली. ऋषभ पंत टेस्ट क्रिकेटमध्येही चमकदार कामगिरी करू शकतो, असं द्रविड या मुलाखतीमध्ये म्हणला आहे. ऋषभ टेस्ट क्रिकेटमध्ये यशस्वी होईल, अस म्हणतानाच द्रविडनं त्याला संयमानं खेळण्याचाही सल्ला दिला आहे.

भारताच्या इंग्लंड दौऱ्यामध्ये दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत या दोन विकेट कीपरची निवड केली आहे. या दोघांपैकी एका खेळाडूला पहिल्या टेस्ट मॅचमध्ये संधी मिळेल. ऋद्धीमान सहा दुखापतग्रस्त झाल्यामुळे शेवटच्या क्षणी ऋषभ पंतला संधी देण्यात आली. आता इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये कोहली पंतला टीममध्ये घेतो का दिनेश कार्तिकच्या अनुभवाला महत्त्व देतो हे लवकरच कळेल.

आयपीएलमध्ये ऋषभ पंतची जबरदस्त कामगिरी

आयपीएलमध्ये दिल्लीकडून खेळताना ऋषभ पंतनं जबरदस्त कामगिरी केली होती. आयपीएलच्या एका मोसमात पंतनं ६८४ रन केल्या होत्या. आयपीएलच्या एका मोसमात  याआधी कोणीही एवढ्या रन केल्या नाहीत. आयपीएलच्या एका मोसमात पंतनं ३७ सिक्स आणि ६८ फोर अशा एकूण १०५ बाऊंड्री मारल्या होत्या. एका मोसमात १०० पेक्षा जास्त बाऊंड्री मारणारा पंत दुसरा भारतीय आणि चौथा आयपीएल खेळाडू बनला आहे.