LSG vs MI : आयपीएलचा 16 व्या सिझन आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. यंदाच्या वर्षीचा एलिमिनेटर सामना लखनऊ सुपर जाएंट्स ( Lucknow Super Giants ) विरूद्ध मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) यांच्यात रंगणार आहे. चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियम ( M. A. Chidambaram Stadium ) म्हणजेच चेपॉक स्टेडियमवर हा सामना रंगणार असून विजयी टीमचा सामना गुजरात टायटन्सशी ( Gujarat Titans ) होणार आहे. तर आजच्या सामन्यात चाहत्यांच्या मुंबई इंडियन्सकडून ( Mumbai Indians ) खूप अपेक्षा आहेत. हा सामना जिंकण्यासाठी रोहित शर्मा ( Rohit Sharma ) कोणती टीम घेऊन मैदानात उतरणार आहे, हे पाहावं लागणार आहे.
या दोन्ही टीम्सच्या रेकॉर्डवर नजर टाकली तर आतापर्यंत लखनऊ विरूद्ध मुंबई ( Mumbai Indians ) 3 वेळा एकमेकांविरूद्ध मैदानात उतरल्या आहेत. मात्र यावेळी मुंबईच्या टीमला एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात 3 पराभवांचा बदला घेण्याची मुंबईकडे ( Mumbai Indians ) चांगली संधी आहे. तर या सामन्यात मुंबई इंडियन्स विजय मिळवणार का, हे पाहवं लागणार आहे.
मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) ही सर्वात लोकप्रिय आयपीएलमधील टीम मानली जाते. मुंबईने आतापर्यंत सर्वाधिक पाच वेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावलंय. दरम्यान मुंबई इंडियन्ससाठी ( Mumbai Indians ) गेला सिझन अत्यंत वाईट ठरला होता. मात्र यंदाच्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा अंतिम चार टीममध्ये झेप घेतलीये. त्यामुळे आता सहाव्या जेतेपदं अवघे 3 पावलं दूर आहे.
मुंबईचे फलंदाज पाहिले तर ते उत्तम फॉर्ममध्ये आहेत. लखनऊसमोर सर्वात मोठं आव्हान मुंबईच्या फलंदाजांचं असणार आहे. गेल्या सामन्यात मुंबईच्या कॅमेरुन ग्रीनने सनरायजर्स हैदराबादविरोधात शतक केलं होतं. याशिवाय सूर्यकुमार यादव (511 रन्स, एक शतक, चार अर्धशतक), ईशान किशन (439 धावा), ग्रीन (381 धावा) आणि कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) (313 धावा) हे फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे यांच्या कडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.
हार्दिक पंड्या (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), करण शर्मा, प्रेरक मांकड़, मार्कस स्टॉयनिस, आयुष बडोनी, निकोलस पूरन, कृष्णप्पा गौतम, रवि बिश्नोई, नवीन उल हक, मोहसीन खान
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेविड, नेहाल वढेरा, क्रिस जॉर्डन, प्रीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल