IPL 2023: 'तेव्हा माझ्या लक्षात आलं...'; शतकवीर शुभमन गिल केला सर्वात मोठा खुलासा!

Shubhman Gill On GT vs MI: शुभमन गिलच्या धमाकेदार सेंच्यूरीमुळे गुजरातने फायनलचं तिकीट मिळवलंय. शिभमन नेहमीच चांगला कसं काय खेळतो? मुंबईच्या पलटणचा गेम नेमका कुठं झाला? याचं उत्तर दिलंय खुद्द शुभमन गिलने...

Updated: May 27, 2023, 04:07 PM IST
IPL 2023: 'तेव्हा माझ्या लक्षात आलं...'; शतकवीर शुभमन गिल केला सर्वात मोठा खुलासा! title=
Shubhman Gill Century

GT in IPL 2023 Final: एक तो दिवस आठवतो, जेव्हा रोहित शर्मा याने श्रीलंकेविरुद्ध द्विशतक झळकावलं होतं. बॉलर कोण येतोय आणि कोण जातोय, याचं भान देखील कोणाला नव्हतं, सर्वांच्या नजरा मात्र रोहित शर्माच्या बॅटिंगवर. स्टेडियमचे पत्रे तुटेपर्यंत रोहितने बॉलर्सला धुतलं होतं. याच आठवणी जाग्या केल्यात शुभमन गिल याने. मुंबई इंडियन्सविरुद्ध दुसऱ्या क्वॉलिफायर सामन्यात शुभमनने धमाकेदार शतक झळकावलं अन् मुंबई स्वप्नांवर पाणी फिरवलं. 60 बॉलमध्ये 129 धावा, त्यात 7 फोर तर 10 सिक्स... एवढा मोठा भीमपराक्रम केल्याने गुजरातने फायनलचं तिकीट मिळवलंय. शिभमन नेहमीच चांगला कसं काय खेळतो? मुंबईच्या पलटणचा गेम नेमका कुठं झाला? याचं उत्तर दिलंय खुद्द शुभमन गिलने...

काय म्हणाला शुभमन गिल?

माझ्यासाठी हा सामना बॉल टू बॉल आणि ओव्हर टू ओव्हर खेळण्यासाठी होता. ज्या ओव्हरमध्ये मी 3 सिक्स मारले, तेव्हा मला समजलं की हा माझा दिवस असू शकतो, असा खुलासा शुभमन गिलने केला आहे. फलंदाजीसाठीही चांगली विकेट होती. त्याचा फायदा आम्हाला मिळाला. जेव्हा मी चांगली सुरुवात करतो तेव्हा मला आत्मविश्वास वाटतो की मी चांगली धावसंख्या करू शकतो, असंही शुभमन गिल (Shubhman Gill) म्हणाला.

गेल्या आयपीएलपूर्वी मला दुखापत झाली होती परंतु मी माझ्या खेळावर काम करत राहिलो. टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर न्यूझीलंड मालिकेपूर्वी मी काही स्वत:वर काम केलं आणि तांत्रिक बदल केले. तुम्ही एकदा मैदानात उतरलात की संघासाठी योगदान कसं द्यायचं, याचाच प्रयत्न केला जातो. मला वाटतं की कदाचित ही माझी आयपीएलमधील (IPL 2023) आतापर्यंतची सर्वोत्तम खेळी होती, असं शुभमन गिल म्हणाला आहे.

हार्दिकने केलं शुभमनचं कौतूक

मला वाटतं की, आजची खेळी ही त्याची सर्वोत्कृष्ट होती, सामन्यात तो कधीच घाईत दिसला नाही. कोणीतरी बॉल फेकतोय आणि तो मारतोय असं वाटत होतं. तो आंतरराष्ट्रीय आणि फ्रँचायझी क्रिकेटमध्ये सुपरस्टार असेल. मी त्याच्याशी नेहमी बोलतो. प्रत्येकजण आपली जबाबदारी वाटून घेतो, त्यामुळे आम्ही फायनलमध्ये आहे, असं म्हणत हार्दिक पांड्याने (Hardik Pandya On Shubhman Gill) शुभमन गिलचं कौतूक केलंय.

आणखी वाचा - IPL 2023 Qualifier 2 : 'आता तरी देवा मला...' हेच बोलला का तो?; मुंबईचा पराभव होऊनही सचिन- शुभमनच्या फोटोनं जिंकली मनं

रोहितने दिली कौतूकाची थाप

आजचा सामना शुभमनसाठी खरोखर उत्तम होता. त्याने आज खूप चांगली फलंदाजी केली. मला आशा आहे की, तो आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील हाच फॉर्म सुरू ठेवेल आणि चांगल्या खेळाचं प्रदर्शन करेल, असं म्हणत मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्माने (Rohit Sharma On Shubhman Gill) शुभमन गिलचं कौतूक केलंय.