निवृत्ती घेतली तरी MS Dhoni ला लीजेंड्स लीग खेळण्याची परवानगी का नाही? वाचा कारण..

Legends League Cricket 2023 : लिजेंड्स लीगमध्ये गौतम गंभीर, सुरेश रैना, ख्रिस गेल, इरफान पठाण, हरभजन सिंग, जॅक कॅलिस, मार्टिन गप्टील, शेन वॉटसन आणि इतर क्रिकेटपटू खेळताना दिसतात. मात्र, निवृत्ती घेतलेला महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) मात्र दिसत नाही.

सौरभ तळेकर | Updated: Nov 18, 2023, 11:29 PM IST
निवृत्ती घेतली तरी MS Dhoni ला लीजेंड्स लीग खेळण्याची परवानगी का नाही? वाचा कारण.. title=
MS dhoni, legends league cricket

Legend League Cricket : लिजेंड्स लीगच्या दुसऱ्या सीझनला आता सुरूवात झाली आहे. पहिल्या सीझनमध्ये गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) नेतृत्वाखाली इंडिया कॅपिटल्सने लिजेंड्स लीगची (Legend League Cricket) ट्रॉफी जिंकली होती. अशातच आता दुसऱ्या सीझनची सुरूवात 18 नोव्हेंबर रोजी इंडिया कॅपिटल्स आणि भिलवारा किंग्ज यांच्यातील सलामीच्या सामन्याने झाली आहे. या सामन्यात भिलवारा किंग्जने 3 विकेट्सने विजय मिळवला आहे. लिजेंड्स लीगमध्ये गौतम गंभीर, सुरेश रैना, ख्रिस गेल, इरफान पठाण, हरभजन सिंग, जॅक कॅलिस, मार्टिन गप्टील, शेन वॉटसन आणि इतर क्रिकेटपटू खेळताना दिसतात. मात्र, तुम्हाला निवृत्ती घेतलेला महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) मात्र दिसत नाही. धोनीला लिजेंड्स लीगमध्ये खेळण्याची परवानगी का नाही? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

लिजेंड्स लीगमध्ये MS Dhoni का नाही?

महेंद्रसिंग धोनी हा भारतीय क्रिकेट संघातील एक महान खेळाडू म्हणून ओळखला जातो. फलंदाजी असो वा विकेटकिपिंग धोनीने अनेक रेकॉर्डची उलतापालट केली आहे. त्यामुळे त्याने क्रिकेटमध्ये देखील एक वेगळं स्थान निर्माण केलंय. आयसीसीच्या तिन्ही फॉरमॅटमधील ट्रॉफी जिंकण्याचा मान देखील धोनीला जातो. तीनही ICC ट्रॉफी (ODI WC, T20 WC आणि Champions Trophy) जिंकणारा तो एकमेव कर्णधार आहे. मात्र, धोनी एवढा लिजेंड्स असून देखील त्याला लिजेंड्स लीग खेळता येत नाही. त्याला कारण बीसीसीआयचा एक नियम...

बीसीसीआयच्या नियमानुसार कोणत्याही भारतीय पुरुष खेळाडूला तो बोर्डामध्ये खेळत आहे, तोपर्यंत परदेशात किंवा फ्रँचायझी लीगमध्ये भाग घेता येत नाही. त्याची परवानगी बीसीसीआय कधीही देत नाही. भारतीय क्रिकेटमध्ये सक्रीय असलेला खेळाडू जोपर्यंत निवृत्ती घेत नाही, तोपर्यंत त्याला परदेशी लीग किंवा फ्रँचायझी लीगमध्ये भाग घेता येत नाही. भारतीय क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट, देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएल या तिन्ही गोष्टींचा समावेश होतो. धोनीचं गणित पहायला गेलं तर धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली खरी पण धोनी अजूनही आयपीएल खेळतो. त्यामुळे त्याला लिजेंड्स लीगमध्ये खेळता येत नाही.

भारतीय क्रिकेट्सला जर लेजेंड्स लीग, टी-10 लीग, बिग बॅश लीग, द हंड्रेड किंवा इतर कोणत्याही लीगचा भाग व्हायचा असेल तर बीसीसीआयशी दुरावा निर्माण करावा लागतो. एकदा का निवृत्ती घेतली की, घरवापसी नाही... त्यामुळे टीम इंडियाचे खेळाडू इतर खेळाडूंप्रमाणे लीग मॅच खेळताना दिसत नाहीत.

आणखी वाचा - 'पोरांनो, वर्ल्ड कप जिंकाच.. स्वत:साठी नाही तर....', फायनलपूर्वी Hardik Pandya चा टीम इंडियासाठी खास संदेश!

Legends League Cricket चं वेळापत्रक 

18 नोव्हेंबर भिलवाडा किंग्स-इंडिया कॅपिटल्स

20 नोव्हेंबर मणिपाल टायगर्स-गुजरात जायंट्स

21 नोव्हेंबर दक्षिणी सुपरस्टार्स-अर्बनरायझर्स हैदराबाद

22 नोव्हेंबर भिलवाडा किंग्स-गुजरात जायंट्स

23 नोव्हेंबर इंडिया कॅपिटल्स-अर्बनाइजर्स हैदराबाद