मुंबई : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी जगभरातून उत्तम खेळाडू निवडून सर्वोत्तम संघ बनवला आहे. सौरव गांगुलीने यामध्ये भारताच्या दोन महान फलंदाजांचा त्याच्या सर्वकालीन सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे. सौरव गांगुलीने आपल्या टीममध्ये सर्वाधिक 3 खेळाडू हे ऑस्ट्रेलियाच्या संघातून निवडले आहेत. मुख्य म्हणजे गांगुलीने वीरेंद्र सेहवाग, अनिल कुंबळे आणि एमएस धोनीसारख्या दिग्गजांची निवड केलेली नाही.
सौरव गांगुली यांनी फक्त 2 भारतीय फलंदाज राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकरचा सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे. त्याचबरोबर विकेटकीपर फलंदाज म्हणून त्याने श्रीलंकेच्या कुमार संगकारावर विश्वास दाखवला आहे. दरम्यान गांगुलीला वीरेंद्र सेहवाग याला टीममध्ये समाविष्ट करायचं होतं.
सौरव गांगुली म्हणाला की, मला वीरेंद्र सेहवागला त्याच्या आवडत्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील करून घ्यायचं होतं, परंतु अॅलिस्टर कूकला बाहेर ठेवणं हा त्याच्यावर अन्याय होईल. गोलंदाज म्हणून सौरव गांगुलीने त्याच्या या टीममध्ये ग्लेन मॅकग्रा, शेन वॉर्न, मुथय्या मुरलीधरन आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन यांना समाविष्ट केलं आहे.
मॅथ्यू हेडन (ऑस्ट्रेलिया), एलिस्टर कूक (इंग्लंड), राहुल द्रविड (भारत), सचिन तेंडुलकर (भारत), जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका), रिकी पॉंटिंग (ऑस्ट्रेलिया), कुमार संगकारा (श्रीलंका), शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया), डेल स्टेन (दक्षिण अफ्रिका), मुथैया मुरलीधरन (श्रीलंका), ग्लेन मॅक्ग्रा (ऑस्ट्रेलिया)