Rohit Sharma: टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असून टी-20 आणि वनडे सिरीजनंतर आता टेस्ट सिरीज खेळण्यात येतेय. मंगळवारपासून या टेस्ट सामन्याला सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी टीम इंडियाची फलंदाजीमध्ये अवस्था बिकट दिसून आली. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र यावेळी टॉस हरल्यानंतर रोहित शर्मा अचानक हसताना कॅमेरात कैद झाला. टॉस गमावूनही रोहित शर्मा का हसत होता, याचा खुलासा रोहितनेच केला आहे.
टॉस हरल्यानंतरही टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा हसताना दिसला. त्याने त्याचं कारणही सर्वांना सांगितलं. रोहित शर्मा म्हणाला की, मला माहित नाही की, प्रथम फलंदाजी करणं की प्रथम गोलंदाजी करणं यापेक्षा चांगला निर्णय कोणता असेल. त्यामुळे अशा परिस्थितीत टॉस हरलेला चांगला. दरम्यान रोहित शर्माला हा मस्करीचा अंदाज चाहत्यांना मात्र काही नवा नाही.
दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात टेस्टमध्ये पदार्पण करणाऱ्या प्रसिध कृष्णाला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली. रवींद्र जडेजाच्या जागी आर अश्विन याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलं आहे. तर रवींद्र जडेजा पूर्णपणे फीट नसल्याने सिलेक्शनसाठी उपलब्ध नव्हता.
टॉस झाल्यानंतर रोहित शर्माने सांगितलं की, टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा गोलंदाजी करावी की फलंदाजी याबाबत मी निश्तित नव्हतो. मला इथल्या परिस्थितीची माहिती असून आम्ही इथे खेळलो आहोत. आम्हाला स्कोअर बोर्डवर मोठा स्कोर उभा करायचा होता. जेणेकरून गोलंदाजांना त्यांचं काम करणं सोप जाईल.
या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी केल्याने आम्हाला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो हे आम्हाला माहीत होतं. पावसाळी वातावरण आणि खेळपट्टीवर गवत असल्याने प्रथम फलंदाजी करणं कठीण होऊ शकतं. परंतु आम्ही आव्हानासाठी सज्ज आहोत. आम्ही जेव्हा या ठिकाणी येतो तेव्हा मोठ्या अपेक्षा घेऊन येतो, गेल्या दोन दौऱ्यांमध्ये आम्ही टेस्ट मालिका जिंकण्याच्या जवळ आलो, मला टीमबद्दल खूप विश्वास आहे, असंही रोहितने म्हटलंय.
पहिल्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाची सुरुवात काही फारशी चांगली झालेली दिसली नाही. टीम इंडियाने दोन्ही ओपनर स्वस्तात माघारी परतले. यसस्वी जयस्वाल 17 आणि रोहित शर्मा अवघ्या 5 रन्सवर माघारी परतले. शुभमन गिल आणि विराट कोहलीला देखील मोठी खेळी करता आली नाही. टीम इंडियाकडून केवल के.एल राहुलने सर्वाधिक 70 रन्सची खेळी केलीये. राहुल नाबाद असून दुसऱ्या दिवशी तो मैदानात उतरणार आहे. पहिल्या दिवसाच्या शेवटी टीम इंडियाचा स्कोर 208 रन्सवर 8 बाद असा आहे.