Why Deepika Padukone Unveil FIFA World Cup Trophy 2022 : सर्वात रोमहर्षक आणि अखेरच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या फायनलमध्ये अर्जेटिंनानं थरारक विजय मिळवलाय. फिफाच्या (FIFA World Cup Final 2022) अंतिम सामन्यात पेनल्टी शूटआऊटवर (Penalty shootout) अर्जेंटिनाने फ्रान्सवर 4-2 अशी मात केली... आणि 36 वर्षानंतर पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकून घेतलाय. कतारच्या लुआस स्टेडियमवर अर्जेंटिना आणि फ्रान्स हा रंजक सामना झाला. दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या (Deepika Padukone) उपस्थितीत हा सामना खास ठरला. दीपिकानं फिफा वर्ल्ड कप 2022 ची ट्रॉफी लॉन्च केली. यासोबत दीपिकानं एक नवा रेकॉर्ड केला आहे. फिफा ट्रॉफी लॉन्च करणारी ती पहिली भारतीय ठरली आहे. पण त्यानंतर अनेकांना प्रश्न पडला की दीपिकाची निवड का करण्यात आली.
DNA इंडियानं दिलेल्या बातमीनुसार, दीपिकाला फिफा ट्रॉफी रिव्हिल करण्यासाठी या साठी निवडले कारण ती यंदाच्या वर्षी मे महिन्यातील लग्झरी क्लोदिंग आणि एक्सेसरीज ब्रँड लुई वुइटनची ग्लोबल एम्बॅसिडर होती. तर लुई वुइटन 2010 पासून फिफा वर्ल्ड कपची पार्टनर होती. गेल्या दहा वर्षांपासून फुटबॉल विश्व कपच्या सपोर्टमध्ये असल्यानं त्यांची ग्लोबल एम्बॅसिडर दीपिका पदुकोणला 18 डिसेंबर रोजी अर्जेंटिना आणि फ्रान्स फायनलमध्ये ट्रॉफी लॉन्च करण्यासाठी निवडले.
[Video] Deepika Padukone unveiling the #FIFAWorldCup trophy pic.twitter.com/aRhbZu9z4q
— Deepika Padukone FC (@DeepikaPFC) December 18, 2022
6.175 किलो वजनाची आणि 18-कॅरेट सोने आणि मॅलाकाइटनं बनवलेल्या या ट्रॉफीला खूप कमी लोक पकडणायचे सोडा तर स्पर्श सुद्धा करू शकतात. यात माजी फिफा विश्वचषक विजेते आणि राष्ट्रप्रमुखांचा यात समावेश आहे. अशा परिस्थितीत दीपिका सोबत संपूर्ण भारतासाठी हा खूप खास क्षण ठरला. ट्रॉफी लॉन्च दरम्यान दीपिकानं स्पॅनिश फुटबॉलपटू इकर कॅसिलास फर्नांडीझसोबत स्टेडियममध्ये प्रवेश केला. हा क्षणही उत्साहाने भरलेला होता.
हेही वाचा : FIFA World Cup ट्रॉफी लॉन्चसोबत Deepika Padukone नं रचला इतिहास!
यावेळी दीपिकानं पांढरा शर्ट, तपकिरी ओव्हरकोट, ब्लॅक बेल्ट परिधान केला होता. दीपिकाचा हा लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. संपूर्ण भारताला दीपिकावर अभिमान आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यापासून, ती ज्युरी सदस्य बनली, ते 'गोल्डन रेशो ऑफ ब्युटी' नुसार जगातील टॉप 10 सर्वात सुंदर महिलांच्या यादीत एकमेव भारतीय असण्यापर्यंत, दीपिकाने जागतिक स्तरावर आपल्याला गर्वरीत केले आहे. लक्झरी ब्रँड आणि अगदी पॉप कल्चर ब्रँडसाठी जागतिक चेहरा म्हणून निवडलेली दीपिका ही एकमेव भारतीय आहे. दोन वेळा टाईम मॅगझिन अवॉर्ड विजेते. जगातील विविध क्षेत्रांतील लीडर्ससोबत ती दिसते.