Ind Vs Pak सामन्यानंतर टीम इंडियाला सोडून युझवेंद्र चहल कुठे निघाला?

Ind vs Pak सामन्यात प्रतिस्पर्धी संघावर मात केल्यानंतर टीम इंडियानं जल्लोषात विजयोत्सव साजरा केला. या सामन्यात खेळण्याची संधी न मिळालेला युझवेंद्र चहल, मात्र कुठे दुसरीकडेच रमला होता.... पाहा Photo

Updated: Oct 24, 2022, 02:10 PM IST
Ind Vs Pak सामन्यानंतर टीम इंडियाला सोडून युझवेंद्र चहल कुठे निघाला?  title=
where were dhanashree verma and yuzvendra chahal at the time of india pakistan match

T20 World Cup Ind Vs Pak : रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वाखाली भारतीय संघ पाकिस्तानशी दोन हात करण्यासाठी मैदानात उतरला. सुरुवातीला या सामन्यामध्ये दोन्ही संघ एकमेकांना टक्कर देताना दिसले. पण, अशी काही वळणं आली जिथे मात्र पाकचा कणा मोडला. हे काम केलं, विराट कोहलीनं. आत्मविश्वासानं परिपूर्ण खेळी करत विराटनं सामना खेचून आणला. भारतानं 4 विकेट्सनं पाकिस्तानला नमवलं. या सामन्यामध्ये एका अपेक्षित खेळाडूची अनुपस्थिती अनेकांनाच धक्का देऊन गेली.

हा खेळाडू म्हणजे युझी अर्थात युझवेंद्र चहल. युझीला (MCG) मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. यादरम्यान तो नेमका काय करत होता हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल, तर युझी यादरम्यान त्याच्या पत्नीसोबत काही खास क्षण व्यतीत करताना दिसला. (Dhanashree Verma Selfie with Yuzvendra Chahal)

अधिक वाचा : IND vs PAK सामन्यानंतर बाबर आझम Virat बद्दल हे काय बोलला? 

फिरकी गोलंदाज चहलला (spinner) पाकिस्तानविरोधातील सामन्यात संधी मिळाली नसली तरीही तो येत्या काळात संघात महत्त्वाची भूमिका निभावताना दिसणार आहे. त्याआधी युझीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, यामध्ये तो पत्नी धनश्री वर्मा हिच्यासोबत विमानात असल्याचं दिसत आहे.

धनश्रीनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या या सेल्फीमध्ये ही सेलिब्रिटी जोडी एका विमानात असल्याचं लक्षात येत आहे. त्यातच तिनं या सेल्फीवर Sydney असंही लिहिलं आहे. भारतीय संघ दुसरा सामना सिडनीला खेळणार आहे. ज्यामुळं युझीसुद्धा तिथेच रवाना झाल्याचं म्हटलं जात आहे.

Dhanashree verma post yuzvendra chahal

मेलबर्नमध्ये Team India ची दिवाळी

मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये खेळवल्या गेलेल्या सुपर 12 फेरतील सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा 4 विकेट्सनं पराभव केला. टॉस जिंकुन भारतीय संघाने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्ताननं 8 गडी गमावत 159 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने 6 गडी गमावले. विराट कोहलीच्या (Virat Kohli) प्रभावी आणि तितक्याच दमदार खेळीच्या बळावर भारतानं विजय मिळवला. विराटनं नाबाद 82 धावा केल्या. तर, मैदानावर त्याला हार्दिक पांड्यानं चांगली साथ दिली.