मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने १९९४ चा एक किस्सा एका कार्यक्रमात बोलताना सांगितला, यात सचिन तेंडुलकर सांगतो की, 'मी आणि अंजली रोझा सिनेमा पाहण्यासाठी गेलो, वरळीत हा सिनेमा आम्ही पाहायला गेलो. तेव्हा मला कुणी ओळखू नये म्हणून मी जरा बदल केला होता, दाढी लावली होती, आणि एक चष्मा देखील घातला होता, तो चष्मा काळा होता. काळा चष्मा आणि नकली दाढी लावून आम्ही वरळीत रोझा सिनेमा पाहायला गेलो, पण पुढे जे काही झालं ते फारच मजेदार होतं'. यावर पुढे बोलताना सचिन तेंडुलकर एका यूट्यूब शोवर हा मजेदार किस्सा हसून हसून सांगत होता. हा शोमध्ये सचिन अधिक मोकळा ढाकळा वाटत होता.
सचिन आपल्या सौभाग्यवतीसह नकली दाढी आणि काळा चष्मा लावून गेला आणि गर्दीत कुणीतरी त्याच्या चष्म्याला धक्का लावला, आणि चष्मा गर्दीत खाली पडला, तो चष्मा गर्दीत सचिनने कसा तरी शोधला, पण त्याचा एक काच निघून गेला होता.
तसाच एक हात लावून सचिनने वेळ मारण्याचा प्रयत्न केला, पण मध्यांतरात कुणी तरी ओळखलं की हा सचिन तेंडुलकर आहे, तेव्हा गर्दी होण्यास सुरूवात झाली आणि तेव्हा मात्र सचिनला हा सिनेमा मध्यांतरातच सोडावा लागला. ऑन ब्रेक फास्ट वुईथ चॅम्पियन या कार्यक्रमात बोलताना सचिनने हा किस्सा सांगितला.