नवी दिल्ली : क्रिकेटमध्ये ऑलराऊंडरचे स्थान विशेष असते. पांड्या हा क्लालिटी पेस बॉलर आहे. हार्दिक पांड्याने पहिल्या टेस्टमध्ये आक्रमक ९३ रन्सची खेळी केल्यानतर केपटाऊनमध्ये ३ विकेटदेखील घेतले.
त्याच्या क्रिकेट करिअरची आता कुठे सुरुवात झालीए पण त्याची तुलना दिग्गज कपिल देवशी केली जाते.
पण पांड्याने आता जबाबदार खेळाडूसारखा खेळ करावा अशी अपेक्षा क्रिकेट जगतातून व्यक्त होत आहे.
आफ्रीका दौऱ्यात पांड्याने वाईट परफॉर्मन्स नाही दिलाय पण त्याचा परफॉर्मन्स टीमच्या गरजा पूर्ण करतोय का ? असा प्रश्न उपस्थित राहत आहे.
न्यूसलॅंडमध्ये त्याने खूप शॉट्स खेळले, काही मिस केले. स्लिपमध्ये डीन एल्गरने त्याची कॅच सोडली. त्याची आक्रमक बॅटींग दिसली. पण हे टेस्ट क्रिकेट आहे हे पांड्याने लक्षात ठेवायला हवे.
पांड्या देखील विकेट घेण्यात अयशस्वी झाला. पांड्या ऑलराऊंडर आहे. ही वेळ त्याने स्वत:च्या खांद्यावर बॅटींग किंवा बॉलिंगची जबाबदारी घेण्याची असल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. जर तो ६ नंबरला बॅटींग करतोय तर त्याने रन्स बनवायला हवेत.
जर तो चौथा बॉलर आहे तर त्याला विकेट घ्यायला हवेत अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.
साऊथ आफ्रिका दौऱ्यात टीम इंडियाची बॅटींग पूर्णपणे ढेपाळल्याचे दिसून येते. हार्दिक पांड्यामूळे अजिंक्य राहणेला टीमबाहेर बसावे लागले.
आपण किती निष्काळजी आहोत हे पांड्याने दूसऱ्या टेस्टमध्ये दोनवेळा दाखवून दिले. रन्स घेताना त्याने बॅट क्रिझवर ठेवली नाही, त्याचा पाय हवेत होता आणि बॉलने स्टम्प टीपला.
पांड्या रन आऊट झाला. पहिल्या टेस्टमध्ये ३ विकेट घेतल्यानंतर २५ ओव्हरमध्ये पांड्याला विकेट मिळाली नाही.
भुवनेश्वरसारख्या मॅच विनरला प्लेइंग ११ मधून बाहेर बसावे लागले. पांड्याला खेळवण्याचा निर्णय आश्चर्यजनक होता.
(फोटो-बीसीसीआय ट्वीटर हॅंडल)