अर्जुन तेंडुलकर मैदानातच झोपला

अर्जुन तेंडुलकरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Updated: Aug 13, 2018, 04:15 PM IST
अर्जुन तेंडुलकर मैदानातच झोपला title=

लंडन : भारत आणि इंग्लंडमधल्या दुसऱ्या टेस्ट मॅचदरम्यान सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर लॉर्ड्सच्या मैदानात होता. लॉर्ड्सच्या मैदानातला अर्जुन तेंडुलकरचा झोपल्याचा फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये अर्जुन तेंडुलकर बाऊंड्री लाईनबाहेर जाहिरातींच्या फलकामागे झोपल्याचं दिसत आहे. 

दुसऱ्या टेस्ट मॅचआधी अर्जुन तेंडुलकरनं भारतीय टीमला बॉलिंग करून त्यांना सराव दिला होता. तसंच या टेस्ट मॅचदरम्यान लॉर्ड्स मैदानाच्या बाहेर रेडिओ विकतानाचा अर्जुनचा फोटो हरभजन सिंगनं ट्विट केला होता.

इंग्लंडमध्ये जाण्यापूर्वी अर्जुन तेंडुलकरनं श्रीलंकेविरुद्ध अंडर १९ यूथ टेस्टमधून क्रिकेटमध्ये आगमन केलं. या टेस्ट सीरिजमध्ये अर्जुननं ३ विकेट घेतल्या तर १४ रन केल्या आणि २ कॅच पकडले. टेस्ट सीरिजनंतर झालेल्या वनडे सीरिजमध्ये अर्जुन तेंडुलकरची निवड झालेली नव्हती.