IND vs AFG 3rd T20I : वर्ल्ड कपपूर्वी अखेरची संधी, रोहित शर्मा काढणार हुकमी एक्का, पाहा संभाव्य प्लेईंग इलेव्हन

India vs Afghanistan 3rd T20I Playing XI: टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी अखेरचा टी-ट्वेंटी सामना भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळवला जाणार आहे. अशातच आता कॅप्टन रोहितसाठी अखेरची संधी असणार आहे.

सौरभ तळेकर | Updated: Jan 16, 2024, 06:45 PM IST
IND vs AFG 3rd T20I : वर्ल्ड कपपूर्वी अखेरची संधी, रोहित शर्मा काढणार हुकमी एक्का, पाहा संभाव्य प्लेईंग इलेव्हन  title=
IND vs AFG 3rd T20I Playing XI

IND vs AFG 3rd T20I Playing XI : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तिसरा टी-ट्वेंटी सामना (India vs Afghanistan) खेळवण्यात येणार आहे. बंगळुरूच्या मैदानात आता टीम इंडियाची खरी कसोटी लागणार आहे, त्याला कारण म्हणजे अखेरची संधी... आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी (T20 World Cup 2024) टीम इंडियाकडे योग्य प्लेइंग इलेव्हन निवडण्यासाठी अखेरची संधी असणार आहे. अशातच आता अखेरच्या सामन्यासाठी रोहित शर्मा (Rohit Sharma) मोठे बदल करू शकतो. कोच राहुल द्रविड यांनी फायनल रणनिती अशी असेल? यावर सध्या सवाल विचारला जातोय. 

टीम इंडियामध्ये कोणते बदल होणार?

फलंदाजी डिपार्टमेंटमध्ये संजू सॅमसनला अजूनही संधी मिळाली नाही. त्यामुळे अखेरच्या सामन्यात रोहित शर्मा संजूला संधी देईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे जितेश शर्माला बाहेर बसावं लागले. तर गोलंदाजीमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. कुलदीप यादव आणि आवेश खान यांना संधी मिळू शकते. रवी बिश्नोई किंवा वॉशिंग्टन सुंदरच्या जागी कुलदीपला मैदानात उतरवले जाऊ शकते आणि मुकेश कुमारच्या जागी आवेशला मैदानात उतरवले जाऊ शकते.

दरम्यान, हार्दिक पांड्या वर्ल्ड कपसाठी खेळू शकला नाही तर शिवम दुबे याच्याकडे पर्याय म्हणून पाहिलं जातंय. वर्ल्ड कप फायनलमध्ये हार्दिक पांड्याची कमी जाणवली होती. भारताला सहावा पर्यायी गोलंदाज नसल्याने ऑस्ट्रेलियाची बाजू वरचढ ठरली होती. अशातच आता टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा पुन्हा तिच चूक करणार नाही.

टीम इंडिया : रोहित शर्मा (C), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (WK), संजू सॅमसन (WK), शिवम दुबे, वाशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, आवेश खान, मुकेश कुमार.

अफगानिस्तान: इब्राहिम जदरान (C), रहमानुल्लाह गुरबाज (WK), इकराम अलीखिल (WK), हजरतुल्लाह जजई, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, करीम जनत, अजमतुल्लाह उमरजई, शराफुद्दीन अशरफ, मुजीब उर रहमान, फजलहक फारूकी, फरीद अहमद , नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, क़ैस अहमद, गुलबदीन नायब, राशिद खान.