Cameron Green on Rohit Sharma: सर्वांना उत्सुकता असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपला (WTC 2023 Final) आता फक्त 2 दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे आता रोहितसेना नेटमध्ये कसून सराव करताना दिसते. टेस्टचा बादशाह कोण? भारत की ऑस्ट्रेलिया? हे ठरवण्यासाठी दोन्ही संघाकडे शेवटचा सामना (IND vs AUS) खेळवा लागणार आहे. त्यामुळे आता दोन्ही संघाच्या ड्रेसिंग रूमचं वातावरण चांगलंच तापलंय. अशातच आता रोहितच्या तालमीत तयार झालेला मुंबई इंडियन्सचा स्टार ऑस्ट्रेलियन फलंदाज कॅमरून ग्रीन (Cameron Green) याने रोहित शर्माचं (Rohit Sharma) कौतूक केलंय.
रोहित मैदानावर जी शांत वृत्ती दाखवतो, ती स्पष्टपणे दिसून येत होती. तो बऱ्याच काळापासून खेळत आहे आणि 10 वर्षांपासून जास्त काळ तो संघासोबत आहे. मैदानावर त्याच्यासोबत वेळ घालवणं आणि बोलणं खूप चांगला अनुभव होता. आक्रमकपणे खेळण्याचा प्रयत्न करणं ही माझी भूमिका होती आणि अशा स्थितीत फिरकीपटू किंवा वेगवान गोलंदाजांविरुद्ध आक्रमक फलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण करताना गोलंदाजी बदलणं असो, रोहित शर्माने मला मार्ग दाखवला, असं कॅमरून ग्रीन (Cameron Green on Rohit Sharma) म्हणाला आहे.
आणखी वाचा - WTC Final पूर्वी कांगारूंना मोठा धक्का; ऑस्ट्रेलियाचा 'हा' दिग्गज खेळाडू फायनलमधून आऊट!
कॅमरून ग्रीन यावेळी टीम इंडियाचा किंग कोहली याच्यावर देखील भाष्य केलंय. विराट कोहली हा असा खेळाडू आहे जो नेहमी मोठ्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना (WTC 2023 Final) खूप महत्त्वाचा आहे आणि मी त्यात खेळण्यासाठी उत्सुक आहे, असं कॅमरून ग्रीन म्हणाला आहे. आयसीसीसोबत (ICC) बोलताना त्याने हे वक्तव्य केलंय.
दरम्यान, टी-ट्वेंटी फॉरमॅटमधून टेस्ट फॉरमॅटमध्ये आम्ही सर्वजण खेळतोय. या परिस्थितीशी जुळवून घेण्यात विराटला (Virat Kohli) कोणतीही अडचण येणार नाही, असं मत देखील ग्रीनने यावेळी व्यक्त केलंय. माझ्या मते सर्वोत्तम खेळाडू तोच असतो जो अशा परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतो. कसोटी सामन्यात तुम्ही मैदानात असता तेव्हा टी-ट्वेंटी असा वा वनडे क्रिकेट असं काहीही नसतं, तुम्हाला सामना कसोटीप्रमाणे खेळावा लागतो, असंही मत ग्रीनने व्यक्त केलं आहे.