Ajinkya Rahane : ड्रॉप झाल्यानंतर कुटुंबाने मला...; 18 महिन्यांनंतरच्या कमबॅकवर रहाणे भावूक

Ajinkya Rahane : दोन वर्षांनंतर टीम इंडियामध्ये मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणेचं ( Ajinkya rahane ) कमबॅक होणार आहे. अजिंक्य रहाणेसाठी हा क्षण उत्तम असणार असून तो फार खूश असल्याचं रहाणेने म्हटलंय.

Updated: Jun 4, 2023, 06:19 PM IST
Ajinkya Rahane : ड्रॉप झाल्यानंतर कुटुंबाने मला...; 18 महिन्यांनंतरच्या कमबॅकवर रहाणे भावूक title=

Ajinkya Rahane : टीम इंडिया ( Team India ) सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ( ICC World Test Championship ) तयारीमध्ये आहे. इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर टीम इंडिया ( Team India ) विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये ही सिरीज रंगणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी तब्बल दोन वर्षांनंतर टीम इंडियामध्ये मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणेचं ( Ajinkya rahane ) कमबॅक होणार आहे. असा अनुभव नक्कीच एखाद्या खेळाडूसाठी खूप स्पेशल असतो. अजिंक्य रहाणेसाठी हा क्षण उत्तम असणार असून तो फार खूश असल्याचं रहाणेने म्हटलंय.

7 जून पासून होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ( ICC World Test Championship ) सामन्यासाठी टीम इंडियाच्या ( Team India ) खेळाडूंची तयारी सुरु आहे. अशातच बीसीसीआयने अजिंक्य रहाणेचा ( Ajinkya rahane ) एक व्हिडीओ बीसीसीआय ( BCCI ) टीव्हीवर पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये रहाणे म्हणतो की, 18-19 महिन्यांच्या कालावधीनंतर मी टीम इंडियामध्ये कमबॅक करणार आहे. टीममध्ये परतणं हे माझ्यासाठी खूप खास आहे.  

अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya rahane ) म्हणण्यानुसार, ज्यावेळी मला टीममधून ड्रॉप करण्यात आलं होतं, तेव्हा माझ्या कुटुंबाने मला भरपूर पाठिंबा दिला. भारतासाठी खेळण्याच्या स्वप्नाला मी नेहमीच जिवंत ठेवलं होतं. भारतासाठी खेळणं माझ्यासाठी फार महत्त्वाचं असल्याचं मी माझ्या कुटुंबाला सांगितलं होतं. सध्या मी माझ्या फलंदाजीवर फोकस करतोय. मी माझ्या सध्याच्या फॉर्म तसाच ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. 

अखेर रहाणे करणार कमबॅक

तब्बल 18 महिन्यानंतर अजिंक्य रहाणे ( Ajinkya rahane ) इंडियाच्या ( Team India ) टेस्ट टीममध्ये कमबॅक करणार आहे. रहाणेने भारताकडून 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध शेवटची सिरीज खेळली होती. या सिरीमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर टीम इंडियामधून अजिंक्य रहाणेला ( Ajinkya rahane ) बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. 

दरम्यान दुसरीकडे अजिंक्य रहाणेने ( Ajinkya rahane ) त्याचा खेळ सुरु ठेवला. रणजी ट्रॉफीमध्ये 7 सामन्यांमध्ये 634 रन्स केले. याशिवाय आयपीएलमध्येही त्याचा उत्तम फॉर्म दिसून आला. त्याचा हा फॉर्म पाहता अजिंक्य रहाणेला ( Ajinkya rahane ) पुन्हा एकदा टीम इंडियामध्ये ( Team India ) संधी देण्यात आलेली आहे.