काय आहे RTM कार्डचा नियम? IPL 2025 मेगा ऑक्शनमध्ये कोणत्या टीमला होणार याचा फायदा?

IPL 2025 Mega Auction : यंदा आयपीएल  गवर्निंग काउंसिलकडून आयपीएल 2025 साठी एकूण 8 नियमांची घोषणा केली आहे. आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनसाठी पुन्हा एकदा RTM कार्डचा नियम पुन्हा एकदा उपयोगात आणला जाणार आहे.

पुजा पवार | Updated: Sep 29, 2024, 01:22 PM IST
काय आहे RTM कार्डचा नियम? IPL 2025 मेगा ऑक्शनमध्ये कोणत्या टीमला होणार याचा फायदा?  title=
(Photo Credit : Social Media)

IPL Auction 2025 RTM Card Rule : इंडियन प्रीमिअर लीग ही जगातील सर्वात प्रसिद्ध आणि मोठी टी 20 लीग आहे. आयपीएलच्या 18 व्या सीजनसाठी लवकरच मेगा ऑक्शन पार पडणार असून 28 सप्टेंबर रोजी आईपीएल गवर्निंग काउंसिलकडून खेळाडूंच्या रिटेंशन पॉलिसी जाहीर करण्यात आली. यंदा गवर्निंग काउंसिलकडून आयपीएल 2025 साठी एकूण 8 नियमांची घोषणा केली आहे. आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनसाठी पुन्हा एकदा RTM म्हणजेच राइट टू मॅच  हा नियम पुन्हा एकदा उपयोगात आणला जाणार आहे. परंतु RTM नियम म्हणजे नेमकं काय आणि याचा कोणत्या टीमला फायदा होऊ शकतो याविषयी जाणून घेऊयात. 

काय आहे RTM चा नियम? 

राइट टू मॅचचा नियम हा सर्वात आधी 2018 मध्ये झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये लागू करण्यात आला होता. यात जर कोणती टीम त्यांच्या कोणत्याही खेळाडूला ऑक्शनपूर्वी रिटेन करू शकली नाही तर या स्थितीत ऑक्शनच्यावेळी त्याला पुन्हा एकदा आपल्या टीममध्ये परत घेण्याची संधी त्याला मिळेल. परंतु यासाठी त्या खेळाडूवर दुसऱ्या फ्रेंचायझीने जी बोली लावली असेल त्याच रकमेच्या बोलीवर त्यांना त्या खेळाडूला आपल्या संघात घ्यावे लागेल. ही किंमत त्या खेळाडूला मिळालेल्या आधीच्या किंमतीपेक्षा कमी किंवा जास्त असू शकते. 

उदाहरण पाहायचं झालं, जर मुंबई इंडियन्सने मेगा ऑक्शनपूर्वी ईशान किशनला रिटेन केले नाही आणि ऑक्शनमध्ये पंजाब किंग्सने ईशानला आपल्या संघात घेण्यासाठी बोली लावली आणि त्याला खरेदी केले तर मुंबई इंडियन्स आरटीएम कार्ड वापरूम ईशानला त्याच किंमतीत आपल्या टीममध्ये पुन्हा एकदा सामील करू शकते. पण त्यासाठी मुंबईला पंजाबने ईशानला खरेदी करण्यासाठी जेवढी बोली लावली तेवढ्याच पैशांनी त्याला विकत घ्यावे लागेल. 

हेही वाचा : बीसीसीआयची मोठी घोषणा! IPL च्या प्रत्येक मॅचसाठी खेळाडूंना मिळणार वनडेपेक्षाही जास्त मॅच फी

 

6 खेळाडूंना रिटेन केल्यास RTM कार्ड वापरता येणार नाही : 

आयपीएल गवर्निंग काउंसिल द्वारे जाहीर करण्यात आलेल्या रिटेंशन नियमानुसार फ्रेंचाइजी त्यांच्या टीममधील 6 खेळाडूंना रिटेन करू शकतात. यात ५ कॅप तर एक अनकॅप खेळाडूंचा समावेश असणे गरजेचे आहे. जर ऑक्शनपूर्वी फ्रेंचाइजी त्यांच्या टीममधील 6 खेळाडूंना रिटेन करतात तर त्यांना ऑक्शनच्यावेळी RTM कार्ड वापरता येणार नाही. यावेळी 6 खेळाडूंमधून जास्तीत जास्त भारतीय आणि परदेशी खेळाडूंची निवड करता येईल, असे नियमात स्पष्ट करण्यात आले आहे.