Yo-Yo Test : नेमकी काय असते ही यो-यो टेस्ट? या टेस्टशिवाय मिळत नाही टीम इंडियामध्ये एन्ट्री

Yo-Yo Test : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) , स्टार खेळाडू विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी ही टेस्ट पास केली आहे. मात्र सर्वांच्या मनात एक प्रश्न आहे तो म्हणजे, ही यो-यो टेस्ट ( Yo - Yo Test ) काय असते? चला तर आज जाणून घेऊया काय आहे यो-यो टेस्ट 

सुरभि जगदीश | Updated: Aug 26, 2023, 04:29 PM IST
Yo-Yo Test : नेमकी काय असते ही यो-यो टेस्ट? या टेस्टशिवाय मिळत नाही टीम इंडियामध्ये एन्ट्री title=

Yo-Yo Test : गेल्या 2 दिवसांपासून बातमी सुरु आहे, ती म्हणजे टीम इंडियाच्या काही खेळाडूंनी यो-यो टेस्ट पास केली आहे. यावेळी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) , स्टार खेळाडू विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी ही टेस्ट पास केली आहे. मात्र सर्वांच्या मनात एक प्रश्न आहे तो म्हणजे, ही यो-यो टेस्ट ( Yo - Yo Test ) काय असते? चला तर आज जाणून घेऊया काय आहे यो-यो टेस्ट 

काय असते नेमकी यो-यो टेस्ट ( Yo - Yo Test ) ?

खेळ कोणताही असो, त्यासाठी प्रत्येक खेळाडूने फीट असणं फार गरजेचं आहे. भारतातील अनेक क्रिकेटपटू चांगल्या फॉर्ममध्ये असूनही तंदुरुस्त नसतील तर त्यांना टीमबाहेर बसवण्यात येतं. अशा परिस्थितीत जर खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त असेल तर त्याला एक टेस्ट पास करावी लागते, ही टेस्ट म्हणजे यो-यो टेस्ट ( Yo - Yo Test ).

या टेस्टमध्ये खेळाडूंचा फिटनेस आणि स्टॅमिना तपासला जातो. ही चाचणी पूर्णपणे तंत्रज्ञानाच्या मदतीने घेतली जाते. यो-यो टेस्टसाठी ( Yo - Yo Test ) 23 स्तर आहेत, परंतु खेळाडूंसाठी ते 5 व्या स्तरापासून सुरू होते. संपूर्ण प्रक्रिया सॉफ्टवेअरवर आधारित आहे, ज्यामध्ये त्याचे रिझल्ट्स नोंदवण्यात येतात.

कशी केली जाते ही टेस्ट?

या टेस्टमध्ये 20 मीटर अंतरावर दोन रेषा आखल्या जातात. यामध्ये खेळाडूला एका कोनापासून दुसऱ्या कोनापर्यंत धावावं लागतं. इथून वारसाला दुसऱ्या कोपऱ्यातून पहिल्या कोपऱ्यात धावत यावं लागतं. याला शटल म्हणतात. यामध्ये एकूण 3 कोन मैदानावर लावले जातात. ज्या ठिकाणी कोन B ते कोन C पर्यंतचे अंतर 20 मीटर असतं. यावेळी बीपचा आवाज ऐकू येताच, प्लेअरला धावत जावं लागतं. तर दुसऱ्या बीपच्या आधी कोन C ला स्पर्श करावा लागतो. तर तिसऱ्या बीपच्या आधी प्लेअरला B ची रेषा पार करावी लागते.

या सर्व प्रकारानंतर लेव्हल 2 चाचणी सुरू होते. ज्यामध्ये खेळाडूचा वेग वाढवला जातो. यामध्ये खेळाडूला बी ओलांडण्यापूर्वी बीपचा आवाज आला, तर त्याचा वेग कमी आहे. याशिवाय जर खेळाडू तिसऱ्या बीपच्या आवाजापूर्वी कोन बी वर आला नाही तर त्याला दुसऱ्यांदा इशारा मिळतो. अशा परिस्थितीत, दोन इशाऱ्यांनंतर, खेळाडू चाचणीत नापास होतो.