मुंबई : भारताचा अव्वल फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला (R Ashwin) खात्री आहे की राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली आनंदाचं वातावरण ड्रेसिंग रुममध्ये परतेल. या दिग्गजच्या कोचिंग स्टाईलवर भाष्य करणे घाईचे ठरेल.
रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्या नंतर आता 48 वर्षीय द्रविडची भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली गेली आहे. भारत आणि न्यूझीलंड (India vs new zealand) यांच्यातील सध्याच्या टी-20 मालिकेपासून त्याचा कार्यकाळ सुरू झाला.
चार वर्षे बाहेर राहिल्यानंतर अश्विनने भारताच्या मर्यादित षटकांच्या संघात पुनरागमन केले आहे. ऑफ-स्पिनरने 2017 च्या मध्यापासून मर्यादित षटकांचा एकही सामना खेळलेला नाही आणि संघाच्या अलीकडील इंग्लंडच्या कसोटी दौऱ्यात त्याने प्रेक्षकाची भूमिका बजावली.
अफगाणिस्तानविरुद्ध खेळण्याची संधी मिळाल्यावर 35 वर्षीय खेळाडूने नुकत्याच झालेल्या T20 विश्वचषकात पुनरागमन केले, तो न्यूझीलंडविरुद्धच्या T20 मालिकेसाठी भारतीय संघाचा देखील एक भाग आहे आणि पहिल्या सामन्यात त्याने दोन विकेट घेतल्या.
बुधवारी भारताने पाच गडी राखून विजय मिळविल्यानंतर अश्विन म्हणाला, 'राहुल द्रविड(Rahul Dravid ) च्या कोचिंग शैलीवर भाष्य करणे माझ्यासाठी खूप लवकर ठरेल.''
तो म्हणाला, 'तो अनेक गोष्टी नशिबावर सोडणार नाही आणि तयारी आणि प्रक्रियेवर त्याचा विश्वास आहे.' भारतीय संघात एक नवीन नेतृत्व गट तयार करण्यात आला आहे. द्रविडने शास्त्रींची जागा घेतली आहे, तर टी-20 मध्ये विराट कोहलीच्या जागी रोहित शर्मा संघाची धुरा सांभाळत आहे.