IND vs NZ: आम्ही चांगले खेळलो पण...; पराभवानंतर टॉम लॅथमने सांगितलं, कुठे झाली नेमकी चूक...!

IND vs NZ: न्यूझीलंडवर 4 विकेट्सने विजय मिळवून पॉईंट्स टेबलमध्येही ( Points Table ) पहिलं स्थान पटकावलं आहे. यावेळी न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने ( Tom Latham ) खेळाडूंबाबत मोठं विधान केलं आहे.  

सुरभि जगदीश | Updated: Oct 23, 2023, 08:32 AM IST
IND vs NZ: आम्ही चांगले खेळलो पण...; पराभवानंतर टॉम लॅथमने सांगितलं, कुठे झाली नेमकी चूक...! title=

IND vs NZ: वर्ल्डकप कप 2023 मध्ये रविवारी धरमशालाच्या मैदानावर टीम इंडियाने ( Team India ) इतिहास रचला. तबब्ल 20 वर्षांनी आयसीसी वर्ल्डकपमध्ये भारताने न्यूझीलंडचा ( IND vs NZ ) पराभव केला. या विजयाने भारताने न्यूझीलंडचा ( IND vs NZ ) विजयी रथ रोखला. न्यूझीलंडवर 4 विकेट्सने विजय मिळवून पॉईंट्स टेबलमध्येही ( Points Table ) पहिलं स्थान पटकावलं आहे. यावेळी न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने ( Tom Latham ) खेळाडूंबाबत मोठं विधान केलं आहे.  

पहिल्या पराभवानंतर काय म्हणाला टॉम लॅथम

न्यूझीलंडच्या टीमचा यंदाच्या वर्ल्डकपमधील हा पहिलाच पराभव होता. या पराभवानंतर टॉम लॅथम ( Tom Latham ) म्हणाला की, “आम्ही खूप चांगल्या पद्धतीने खेळलो. आम्ही शेवटच्या 10 मध्ये पूर्ण फायदा घेतला नाही. आम्ही त्या गोष्टी तिथेच सोडल्या. परंतु श्रेय भारताला जाते. रचिन आणि मिशेलने चांगली पार्टनरशिप करून आम्हाला शेवटच्यापर्यंत सेट केले. 

डेरिलने चांगली शतकी खेळी केली. गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली. टीमच्या खेळाडूंनी केवळ सक्रिय राहण्याचा प्रयत्न करावा आणि मॅचअपवर थोडेसे लक्ष केंद्रित करावं. आम्हाला आता काही दिवसांचा वेळ आहे. त्यावेळी आम्ही काही गोष्टींकडे लक्ष देऊ, असं टॉमने म्हटलंय.

विराट कोहलीबाबत बोलताना टॉम लॅथम ( Tom Latham ) म्हणाला की, 'कोहलीने उत्कृष्ट खेळी खेळली. त्याने मैदानावर रन्सचा वेग कायम ठेवला. मुख्य म्हणजे विराटने गरज असताना चांगला खेळ दाखवला आहे.'

20 वर्षांनंतर टीम इंडियाकडून न्यूझीलंडचा पराभव

20 वर्षांनंतर आयसीसी वर्ल्डकप 2023 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा ( Team India ) हा विजय आहे. याआधी 2003 च्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला न्यूझीलंडचा पराभव करण्यात यश आलं होतं. मात्र त्यानंतर न्यूझीलंडने आयसीसी स्पर्धांमध्ये भारतीय टीमवर सातत्याने वर्चस्व गाजवलं होतं. मात्र यावेळी टीम इंडियाने ( Team India ) धर्मशालाच्या मैदानावर शानदार विजय मिळवत हा विक्रम मोडीत काढला आहे.