मुंबई : भारताविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी वेस्ट इंडिजने त्यांच्या टीमची घोषणा केली आहे. २ टेस्ट मॅचच्या या सीरिजसाठी रहकीम कॉर्नवॉलची वेस्ट इंडिजच्या टीममध्ये पहिल्यांदाच निवड करण्यात आली आहे. भारताविरुद्धच्या टेस्टमध्ये कॉर्नवॉलला संधी मिळाली, तर त्याचं टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण होईल. ऑफ स्पिनर ऑलराऊंडर असलेला रहकीम कॉर्नवॉल १४० किलो वजनाचा आहे. कॉर्नवॉलची उंची ६ फूट ६ इंच आहे. आपल्या वजनामुळे रहकीम कॉर्नवॉल चर्चेत आला आहे.
वेस्ट इंडिजच्या टीममध्ये निवड झाल्यानंतर कॉर्नवॉलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मागच्याच महिन्यात भारत ए आणि वेस्ट इंडिज ए यांच्यात वनडे सीरिज झाली. या मॅचदरम्यान कॉर्नवॉल बॅटिंगला येत होता, तेव्हा भारताचा फास्ट बॉलर दीपक चहरने त्याच्या चालण्याची नक्कल केली. कॉर्नवॉलच्या अंगावर जात असतानाच दीपक चहर शेवटच्या सेकंदाला बाजूला झाला.
— Mushfiqur Fan (@NaaginDance) July 17, 2019
१४० किलो वजनाच्या रहकीम कॉर्नवॉलला भारताविरुद्धच्या टेस्टमध्ये खेळण्याची संधी मिळाली, तर तो जगातला सगळ्यात वजनदार आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होण्याचा विक्रम करू शकतो. १९०० च्या दशकात खेळलेल्या ऑस्ट्रेलियाच्या वारविक आर्मस्ट्राँग यांच्यानावावर हे रेकॉर्ड आहे. आर्मस्ट्राँग यांचं वजन १३३ किलो एवढं होतं.
Despite being so huge and 158KG fella, Rahkeem Cornwall has played some glorious knock in the past. pic.twitter.com/Te7LNldhSE
— Mufaddal Vohra (@mufaddal_333) August 10, 2019
५५ प्रथम श्रेणी मॅचमध्ये कॉर्नवॉलने २४.४३ च्या सरासरीने २,२२४ रन केले आहेत. तर २३.६० च्या सरासरीने २६० विकेटही घेतल्या आहेत. या कामगिरीमुळे कॉर्नवॉलची भारताविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी निवड करण्यात आली. २०१७ साली भारताविरुद्धच्या सराव सामन्यात कॉर्नवॉलने ५ विकेट घेतल्या होत्या. यामध्ये चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्या विकेटचा समावेश होता.