होणाऱ्या पत्नीला रागे भरत चहल विचारतो, 'रसोडे मे कौन था'?

क्रिकेटर्सच्या जोडीदारांची चर्चा सुरु असतानाच चहलची होणारी पत्नीही सर्वांचं लक्ष वेधत आहे

Updated: Sep 3, 2020, 03:40 PM IST
होणाऱ्या पत्नीला रागे भरत चहल विचारतो, 'रसोडे मे कौन था'?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : सध्याच्या घडीला आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या तयारीमध्ये व्यग्र असणाऱ्या युझवेंद्र चहल यानं कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून क्रीडा रसिकांसोबतच नेटकऱ्यांना थक्क केलं आहे. तो पोस्ट करत असणारे फोटो आणि व्हिडिओ विशेष लक्ष वेधून जातात. त्यातच आता लक्ष वेधत आहे चहलचा आणखी एक व्हिडिओ. 

यावेळी मात्र तो या व्हिडिओमध्ये संतापलेलाल दिसत आहे. आता चहल नेमका का संतापला, तेसुद्धा त्याच्या होणाऱ्या पत्नीवर.... असं का, हाच प्रश्न तुम्हालाही पडला ना? तर, चहलचा हा राग आहे एका धमाल व्हायरल व्हिडिओसाठी. 

'रसोडे मे कौन था?', असं विचारणाऱ्या 'कोकिलाबेन', 'गोपीबहू' आणि 'राशी' यांचा एक व्हिडिओ गेल्या बऱ्याच दिवसांपासून कमालीचा व्हायरल होत आहे. रॅप स्वरुपात सादर केल्या जाणाऱ्या या व्हिडिओचे अनेक व्हर्जनही सध्या प्रचंड गाजत आहे. 'साथ निभाना साथिया' मालिकेतील एका दृश्याचाच हा व्हिडिओ पाहून, चहल आणि त्याची होणारी पत्नी धनश्री हिलाही त्यावर आपल्या अंदाजात काहीतरी भन्नाट करण्याचा मोह आवरता आलेला नाही. परिणामी, त्यांनी 'रसोडे मे कौन था',चं त्यांचं व्हर्जन सादर केलं आहे. 

आता आमची पाळी... धनश्री, तर सांग 'रसोडे मै कौन था', असं कॅप्शन देत चहलनं हा व्हिडिओ शेअर केला. त्याच्या या व्हिडिओला असंख्य लाईक्स आणि कमेंट्स आल्या असून, ओरिजिनल व्हिडिओपेक्षाही जास्त पसंती चहल आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीच्या या व्हिडिओला मिळाली आहे.