VIDEO : सौरव गांगुलीचा डान्स बघितलात का?

भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीला प्रिन्स ऑफ कोलकाता आणि बंगाल टायगर आणि दादा या नावानंही ओळखलं जातं.

Updated: May 31, 2018, 07:48 PM IST
VIDEO : सौरव गांगुलीचा डान्स बघितलात का? title=

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीला प्रिन्स ऑफ कोलकाता आणि बंगाल टायगर आणि दादा या नावानंही ओळखलं जातं. मैदानावर कायमच आक्रमक असणारा सौरव गांगुली मैदानाबाहेर मात्र नेहमीच शांत दिसतो. गांगुलीनं २००२ साली लॉर्ड्सच्या मैदानात टी शर्ट उतरवून केलेलं सेलिब्रेशन क्रिकेट चाहत्यांच्या कायमच लक्षात राहिल. यानंतर आता सौरव गांगुलीचा डान्स सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. सौरव गांगुलीच्या डान्सचा हा व्हिडिओ कधीचा आणि कुठला आहे याबाबत मात्र माहिती मिळालेली नाही. सौरव गांगुली एका नाईट क्लबमध्ये डान्स करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. देसी बॉईज या चित्रपटाचं गाणं तू मेरा हिरो यावर सौरव गांगुली डान्स करत आहे.