'पाकिस्तानात आजही मी मॅच फिक्सर', Wasim Akram चा दाटून आला कंठ; पाहा Video

Wasim Akram Interview: पाकिस्तानात मला आजची पिढी एक मॅच फिक्सर (Match fixer) म्हणून ओळखते, असं वसिम अक्रम म्हणाला आहे. वसिमच्या या वक्तव्यानंतर जगभर एकच चर्चा होताना दिसते.

Updated: Nov 21, 2022, 12:37 AM IST
'पाकिस्तानात आजही मी मॅच फिक्सर', Wasim Akram चा दाटून आला कंठ; पाहा Video title=
Wasim Akram

Wasim Akram Video: पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि स्टार वेगवान गोलंदाज वसिम अक्रमने (Wasim Akram) एका शोमध्ये खळबळजनक वक्तव्य केलं आहे. जगभरात तसेच भारतात मला आजही महान गोलंदाजांपैकी एक मानलं जातं. मात्र पाकिस्तानात मला आजची पिढी एक मॅच फिक्सर (Match fixer) म्हणून ओळखते, असं वसिम अक्रम म्हणाला आहे. वसिमच्या या वक्तव्यानंतर जगभर एकच चर्चा होताना दिसत आहे. (Wasim Akram Responds to Being Called Match Fixer by Pakistans Social Media Generation Watch Video)

नेमकं काय म्हणाला Wasim Akram?

ऑस्ट्रेलिया असो.., इंग्लंड, वेस्ट इंडीज असो किंवा आणि भारत... माझं नाव हे जगातील सर्वोत्तम वर्ल्ड इलेव्हनमध्ये घेतलं जातं. सर्वजण मला जगातील एक महान गोलंदाजांपैकी एक म्हणून सन्मान देतात. मात्र पाकिस्तानात आताची जनरेशन (Social Media Generation) म्हणजेच आत्ताची सोशल मीडिया जनरेशन मला मॅच फिक्सर म्हणते, असं म्हणताच वसिम अक्रमचा कंठ दाटून आला.

पाहा Video - 

काय आहे फिक्सिंग प्रकरण?

1990 मध्येही पाकिस्तानमध्ये काही खेळाडू फिक्सिंग (match fixing By Pakistani Players) करताना पकडले गेले होते. यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायमूर्ती मलिक मोहम्मद खय्याम यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. 2000 मध्ये खय्याम यांनी अता-उर-रहमान (Ata-ur-Rehman) आणि सलीम मलिक (Salim Malik) यांच्यावर आजीवन बंदी घालण्याची शिफारस केली होती. मात्र, काही दिवसांनी दोघेही टीममध्ये परतले होते.

आणखी वाचा - पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचा बॉलिवूडच्या अभिनेत्रीवर जडला जीव पण...

दरम्यान, रहमानची साक्ष चुकीची असल्याचं सिद्ध झाल्यावर वसीम अक्रमवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. यानंतर चौकशी समितीने वकार, इंझमाम आणि मुश्ताकसह पाच खेळाडूंना दंड करण्याचा सल्ला दिला, परंतु पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) फक्त मलिक आणि रहमानवरच कारवाई केली. 2006 मध्ये न्यायमूर्ती खय्याम यांनी गौप्यस्फोट केला होता. त्यांच्या अहवालावर अक्रमच्या उत्कृष्ट गोलंदाजीचा प्रभाव पडला होता, असं ते म्हणाले होते.