याआधी कधीही सुर्यकुमारने कॅमेरासमोर जे केलं नाही ते कृत्य केलं!

तुम्हालाही विश्वास बसणार नाही पण खरं आहे सुर्यकुमारने....

Updated: Nov 20, 2022, 11:12 PM IST
याआधी कधीही सुर्यकुमारने कॅमेरासमोर जे केलं नाही ते कृत्य केलं! title=

Suryakumar Yadav with Chahal TV : आज रविवारी झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडच्या संघावर दमदार विजय मिळवला आहे. भारताच्या सुर्यकुमार यादवने या सामन्यात शतकी खेळी करत पुन्हा एकदा सर्वांची मनं जिंकली आहेत. सुर्याने अवघ्या 49 चेंडूंमध्ये शतक करत  नाबाद 111 धावा केल्या. भारताच्या 192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडचा संघ 126 धावांवर ऑल आऊट झाला. भारताने हा सामना 65 धावांनी जिंकला. मात्र चर्चा होत आहे ती सामनावीर ठरलेल्या सुर्यकुमारने कॅमेरासमोर कधीही जी गोष्ट केली नाही ती केली. 

सामना संपल्यावर चहल टीव्हीसोबत सुर्याने संवाद साधला. यावेळी, सुर्यकुमारने खचाखच भरलेल्या प्रेक्षकांमधून त्याच्या एका चाहत्याला बोलावलं तेव्हा त्या चाहत्याला सुर्याने 5 सेकंद दिले आणि त्याला जो हवा तो प्रश्न विचारायला लावला. त्या चाहत्याने सुर्याला, तुला 360 प्लेअर अशी उपाधी दिली जाते तेव्हा कसं वाटतं?, असा प्रश्न केला. 

सुर्याने यावर उत्तर देत, 360 हा एकच आहे. मला त्याच्यासोबत खेळण्याची संधी मिळाली नाही पण अनेकवेळा बोलणं झाल्याचं सांगितलं सुर्याचा हा व्हिडओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. भारत आणि न्यूझीलंडमधील दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये भारताने 65 धावांनी विजय मिळवला. 

व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा-

भारताकडून सुर्यकुमारच्या वादळी शतकाच्या जोरावर भारताने निर्धारित 20 षटकात 192 धावांचं आव्हान ठेवलं होतं. न्यूझीलंडकडून केन विल्यमसन वगळता मोठी खेळी करता आली नाही. भारतीय वेगवान माऱ्यापुढे न्यूझीलंडचा संघ 126 धावांवर आटोपला. दीपक हुड्डाने  सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.