Virendra Sehwag च्या मुलाची दिल्ली संघात निवड, वडिलांसारखी बॅटिंग स्टाईल! Watch Video

Team India: आर्यवीर सेहवाग आता आपल्या वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकण्यास सज्ज झाला आहे. आता प्रोफेशनल क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे. दिल्ली संघात आर्यवीर सेहवागची निवड झाली आहे. आर्यवीर आपल्या वडिलांसारखा आक्रमक फलंदाजी करतो.

Updated: Dec 6, 2022, 06:00 PM IST
Virendra Sehwag च्या मुलाची दिल्ली संघात निवड, वडिलांसारखी बॅटिंग स्टाईल! Watch Video title=

Son of Virender Sehwag: भारतीय क्रिकेट संघातील माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग त्याच्या आक्रमक खेळीसाठी ओळखला जातो. त्याच्या बिनधास्त अंदाजामुळे क्रीडाप्रेमींना आवडता खेळाडू होता. त्याने ऑनफिल्ड कधीच टेन्शन घेतलं नाही आणि विरोधकांना सळो की पळो करून सोडलं. आता विरेंद्र सेहवागनंतर त्याचा मुलगा आर्यवीर सेहवाग प्रोफेशनल क्रिकेट खेळताना दिसणार आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरनंतर आता आर्यवीर मैदानात आपली जादू दाखवणार आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाद्वारे आयोजित केलेल्या अंडर-16 विजय मर्चेंट ट्रॉफीसाठी दिल्लीच्या संघात निवड झाली आहे. आर्यवीर 15 वर्षांचा असून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये फलंदाजीसाठी सज्ज आहे. 

आर्यवीर आपल्या वडिलांप्रमाणे आक्रमक फलंदाजी करण्यावर विश्वास ठेवतो.  आर्यवीरची बॅटिंग स्टाइल जवळपास विरेंद्र सेहवागच्या बॅटिंगशी मिळती जुळती आहे. त्याचा सरावाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आर्यवीरचा आवडता खेळाडू आहे. आर्यवीर सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह असतो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

विरेंद्र सेहवागची क्रिकेट कारकिर्द

विरेंद्र सेहवागने आतापर्यंत 104 कसोटी, 251 एकदिवसीय, 19 टी 20 सामने खेळला आहे. टेस्टमध्ये 23 शतकांसह 8586 धावा, एकदिवसीय सामन्यात 15 शतकांसह 8273 धावा आणि 19 टी 20 सामन्यात 394 धावा केल्या. 

बातमी वाचा- क्या बात है! ब्राझीलच्या 'या' खेळाडूनं चार वेळा डोक्यावर उडवला फुटबॉल आणि केला असा गोल; Watch Video

अंडर-16 विजय मर्चेंट ट्रॉफीसाठी दिल्ली टीम

अर्णव बग्गा (कर्णधार), प्रणव, सार्थक रे, अनिंदो, श्रेय सेठी, प्रियांशू, लक्ष्मण, उद्धव मोहन, आर्यवीर सेहवाग, ध्रुव, किरीट कौशिक, नैतिक माथूर, मोहक कुमार, शंतनू यादव आणि सचिन.