मुंबई : पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर दिले आहे. मंगळवारी पहाटे भारतीय वायुदलाने मिराज 2000 या लढाऊ विमानाच्या मदतीने पाकिस्तानच्या ह्द्दीत असलेला काश्मिरच्या भागात हजार किलोचे बॉम्ब टाकले. या कारावाईत बालाकोट, मुझफ्फराबाद येथील दहशतवाद्यांचे कंट्रोल रुम ऊधळून टाकले. वायुदलाकडून पाकिस्तान विरोधात केलेली एक ही मोठी कारवाई आहे.
सोशल मीडिया आणि माध्यमांकडून या हल्ल्याविषयीची माहिती मिळताच सर्व स्तरांतून त्याविषयीच्या प्रतिक्रिया देण्यात आल्या. ज्यामध्ये भारतीय क्रिकेट संघातील माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याच्या ट्विटने अनेकांचे लक्ष वेधले. भारतीय हवाई दलाने केलेल्या या कारवाईचे सेहवागने कौतुक केले आहे. सुधरा, नाही तर आम्ही तुम्हाला आमच्या पद्धतीने सुधारण्यास भाग पाडू, अशी तंबी देखील त्याने आपल्या ट्विटद्वारे दिली आहे. तसेच त्याने #SudharJaaoWarnaSudhaarDenge हा हॅशटॅग देखील वापरला आहे.
The boys have played really well. #SudharJaaoWarnaSudhaarDenge #airstrike
— Virender Sehwag (@virendersehwag) February 26, 2019
पुलवामा हल्ल्यानंतर भारतीयांमध्ये पाकिस्ताना विरोधात संतापाची लाट होती. या हल्ल्याचा बदला घ्यायला हवा, अशी प्रत्येक भारतीयांची इच्छा होती. पुलवामात झालेल्या भ्याड हल्ल्याच्या १२ दिवसांनी भारताने पाकिस्तान वर ही कारवाई केली आहे.
वीरेंद्र सेहवागने पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मुलांची शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. त्याने या बाबतीचे ट्विट करुन म्हणाला की, जवानांचे आपल्यावर खूप उपकार आहेत. आपण त्यांच्यासाठी जितके करु तितके कमीच आहे. आपण निदान शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊ शकतो. या जवानांच्या मुलांनी जर माझ्या शाळेत प्रवेश घेतला तर ती माझ्यासाठी सौभाग्याचे असेल. ' सेहवागची 'सेहवाग इंटरनॅशनल स्कूल आहे.'