Video : भरमैदानात पुन्हा एकदा नवीन उल हकचं 'ते' कृत्य, विराट कोहलीची घोषणा सुरु असताना त्याने...

IPL 2023 Video : नवीन उल हक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचं भरमैदानातील त्या कृत्यामुळे भारतीय नाराज आहेत. लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकता किंग राइयड्सच्या मॅच (IPL 2023 LSG vs KKR)  दरम्यान नवीनचं त्या कृत्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. 

नेहा चौधरी | Updated: May 21, 2023, 10:43 AM IST
Video : भरमैदानात पुन्हा एकदा नवीन उल हकचं 'ते' कृत्य, विराट कोहलीची घोषणा सुरु असताना त्याने... title=
virat kohli vs naveen ul haq ipl LSG vs KKR naveen ul haq shows silence gardens crowd video viral on Social media Google Trending Now

Virat Kohli Vs Naveen Ul Haq : लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यापूर्वी त्यानेरॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा स्टार फलंदाज विराट कोहली याचा सोबत झालेल्या बाचाबाचीमुळे चाहत्यांचा लक्ष्य बनला होता. यानंतर तो सोशल मीडियावर चाहते त्याला ट्रोल करण्याची एकही संधी सोडत नाही आहे. अशात शनिवारी झालेल्या लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकता किंग राइयड्सच्या (lucknow super giants Kolkata Knight Riders) मॅच दरम्यान त्याने भरमैदानात पुन्हा असं काही केलं की तो चाहत्यांचा निशाण्यावर आला आहे. (IPL 2023 LSG vs KKR)

विराट कोहलीची घोषणा सुरु असताना...

कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात नवीन बॉलिंग करताना चाहते कोहलीच्या नावाची घोषणा करत होते. तेव्हा नवीन असं कृत्य केलं की, चाहते नाराज झाले आहेत.  (virat kohli vs naveen ul haq ipl LSG vs KKR naveen ul haq shows silence gardens crowd video  viral on Social media Google Trending Now)

झालं असं की, रवी बिश्नोईने रहमानउल्ला गुरबाजचा आऊट करण्यासाठी बॉल पकडला. त्यावेळी नवीनने प्रेक्षकांच्या दिशेने तोंडावर बोट ठेवून शांत राहण्याचा इशारा केला. नवीनच्या या कृत्यामुळे तो पुन्हा एकदा चाहत्यांचा निशाण्यावर आला आहे. 

विराट आण नवीनमध्ये काय झालं होतं?

आयपीएलच्या एलएसजी आणि आरसीबी यांच्यामधील सामन्यात विराट कोहली अतिशय फॉर्ममध्ये होता. यादरम्यान विराट आणि नवीन यांच्यामध्ये बाचाबाची झाली. विराट आणि नवीन मैदानात भिडले. त्यानंतर अमित मिश्रा आणि पंच यांनी हस्तक्षेप केला. पण नंतर या वादात गौतम गंभीरने उडी घेतली. गंभीर आणि विराटमधील वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकरणी तिन्ही खेळाडूंना बीसीसीआयने दंडही ठोकला. 

जिंकता जिंकता हरली केकेआर

जिंकता जिंकता कोलकाता नाईट रायडर्स एका रनने हरली. लखनऊ सुपर जायंट्सने या विजयासह प्लेऑफ गाठला आहे. प्लेऑफ गाठणारा लखनऊ सुपर जायंट्स तिसरा संघ आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात कोलकाताने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला होता. लखनऊने कोलकातासमोर 176 रन्सचं आव्हान ठेवलं. पण कोलकात्याला केवळ 175 रन्स गाठता आले आणि त्यासोबत त्यांनी एका रनने सामना हरला.