IND vs NZ: भारत विरूद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यामध्ये सध्या वनडे सिरीज सुरु असून बुधवारी झालेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 12 विकेट्सने पराभव (India Beat new zealand) केला. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये खेळला गेलेला हा सामना खूप रोमांचक झाला. एका क्षणी भारताचा पराभव होणार असं वाटत असतानाच शार्दुल ठाकुर (Shardul Thakur) ने चलाखी दाखवत शेवटची विकेट घेतली आणि टीम इंडियाला (Team India) विजय मिळवून दिला.
शेवटच्या ओव्हरमध्ये शार्दुलने मायकल ब्रेसवेल याला LBW आऊट केलं. सामन्यानंतर शार्दूलने शेवटच्या विकेटचं संपूर्ण श्रेय टीमचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ला दिलं. ठाकूरच्या सांगण्याप्रमाणे, कोहलीचा सल्ला ऐकल्याने त्याला ब्रेसवेलची विकेट घेण्यात यश आलं.
भारत जिंकण्याच्या उंबरठ्यावर असताना न्यूझीलंडचा मायकल ब्रेसवेल मोठा अडथळा बनून उभा होता. 350 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना किवी टीमने 131 रन्सवर 6 विकेट्स गमावले होते. अशा कठीण परिस्थितीत मायकल ब्रेसवेल आणि मिचेल सँटनर यांनी टीम इंडियावर पलटवार करत टीम इंडियाच्या गोलंदाजांची दाणादाण उडवली. या दोन्ही फलंदाजांनी 162 रन्सची पार्टनरशीप केली, ज्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन काही प्रमाणात वाढलं होतं.
किवींच्या या जोडीने पहिला वनडे सामना संपूर्ण शेवटच्या ओव्हरपर्यंत नेला. शेवटच्या ओव्हरमध्ये न्यूझीलंडला जिंकण्यासाठी 20 रन्स हवे होते. यावेळी शार्दुल (Shardul Thakur) च्या खांद्यावर भारताला जिंकवण्याची जबाबदारी देण्यात आली. यावेळी पहिल्याच बॉलवर शार्दूलला सिक्स बसला. मात्र यानंतर त्याने टाकलेल्या यॉर्कर बॉलवर ब्रेसवेलला पव्हेलियनमध्ये परतावं लागलं.
दरम्यान सामन्यानंतर बोलताना शार्दुल ठाकूर म्हणाला, विराटने मला फलंदाजाला आऊट करण्यासाठी यॉर्कर लेंथ गोलंदाजी करण्याचा सल्ला दिला हातो.
न्यूझीलंडचे एका मागून एक विकेट पडत असताना मायकल ब्रेसवेल (Michael Bracewell) मैदानात उतरला होता. मायकेल ब्रेसवेल आणि मिचेल सॅन्टनरने टीचून फलंदाजी केली. मायकल ब्रेसवेल 140 धावांची शतकी खेळी केली तर सॅन्टनरने अर्धशतक ठोकेले. या दोन्ही खेळाडूंनी न्यूझीलंडच्या विजयाच्या आशा शेवटपर्यंच जिवंत ठेवल्या होत्या. तसंच टीम इंडियाच्या बॉलर्सच्या नाकात दम करून ठेवला होता.
सामन्यात एक वेळ अशी होती ज्यावेळेस टीम इंडिया सहज विजय मिळवेल अशी आशा होती. मात्र ब्रेसवेलने सर्व आशांवर पाणी फेरले होते. ब्रेसवेलने (Michael Bracewell) टीम इंडियाच्य़ा हाता-तोंडाशी आलेला विजय हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याचा हा प्रयत्न अपयशी ठरला आणि टीम इंडियाने विजय मिळवला.