Australia Captain Slapped By Girlfriend: फलंदाजीच्या बाबतीत अव्वल, कर्णधार (Australia Captain) म्हणून तर त्याहूनही सरस. याच कारणांमुळे त्याने ऑस्ट्रेलियन संघाला जिंकून दिलेला विश्वचषक. मात्र आज त्याला भररस्त्यात मार खावा लागला आहे आणि तो ही स्वत:च्याच गर्लफ्रेण्डकडून (Girlfriend). आता हे सारं वाचून तुम्हाला नेमका हा क्रिकेटपटू आहे तरी कोण असा प्रश्न पडला असेल. तर या तुमच्या मनातील प्रश्नाचं उत्तर आहे मायकल क्लार्क (Michael Clarke). क्लार्कने 2015 साली आपल्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला घराच्या मैदानांवर एकदिवसीय क्रिकेटमधील वर्ल्डकप (ODI World Cup) जिंकून दिला होता. मात्र सध्या क्लार्क गर्लफ्रेण्डबरोबर झालेल्या वादामुळे चर्चेत आहे. क्लार्क आणि त्याच्या गर्लफ्रेण्डमधील वादाचा व्हिडीओ (michael clarke girlfriend public spat video viral) सध्या सोशल मीडियावर (social media) व्हायरल जाला आहे. यामध्ये क्लार्कची गर्लफ्रेण्ड जेड यारब्राऊच्या (Jade Yarbrough) हातून मार खाताना दिसत आहे. क्लार्कला अगदी लाथा-बुक्क्यांनी मारहाण झाल्याचे संकेत या व्हिडीओतून मिळत आहेत.
क्लार्कचं त्याच्या गर्लफ्रेण्डबरोबर भररस्त्यात भांडण झालं. या भांडणाचं कारण ठरलं ते म्हणजे क्लार्कचं डबल डेटिंग करणं. मला प्रेमात फसवलं असा आरोप क्लार्कची गर्लफ्रेण्ड करत असल्याचं दिसून आलं. त्यानंतर दोघांमध्ये रस्त्यावरच हाणामारी झाली. गर्लफ्रेण्ड जेड यारब्राऊने क्लार्कला कानाखाली मारली. त्यानंतर बुक्क्यांनी मारहाण केली आणि लाथाही मारल्या. या हाणामारीमध्ये गर्लफ्रेण्डचे नातेवाईकही सहभागी झाले. त्यावेळी क्लार्कने जेडच्या बहिणीच्या पतीला मारहाण केली. क्लार्कच्या गर्लफ्रेण्डची बहिण ही ऑस्ट्रेलियातील लोकप्रिय टीव्ही अँकर आहे.
क्लार्क आणि त्याच्या गर्लफ्रेण्डमध्ये झालेल्या हाणामारीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये क्लार्क स्पष्टीकरण देताना दिसत आहे. आपल्यावरील सर्व आरोप चुकीचे आहेत असं म्हटलं आहे. प्रासरमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हा व्हिडीओ क्वीन्सलॅण्डमधील असल्याचं सांगितलं जात आहे. या ठिकाणी क्लार्क सुट्ट्यांनिमित्त गेला होता त्यावेळी त्याच्या गर्लफ्रेण्डबरोबरच तिची बहीण जॅसमीन आणि जॅसमीनचा पतीही होता. हा वादा झाला तेव्हा हे सर्वजण रात्रीचं जेवण करत होते. त्यावेळेस बोलताना क्लार्कच्या गर्लफ्रेण्डने डबल डेटिंगच्या मुद्द्यावरुन क्लार्कला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आणि वाद सुरु झाला.
Michael Clarke and Karl Stefanovic fighting over cheating claims pic.twitter.com/OB8u2C6ZMt
— Clown Down Under (@clowndownunder) January 18, 2023
गर्लफ्रेण्डबरोबर झालेल्या या वादानंतर क्लार्कने सार्वजनिकपणे माफी मागितली आहे. 'द डेली टेलिग्राफ'शी संवाद साधताना क्लार्कने, "मी यामुळे फार निराश झालो आहे. मी ज्यांना फार मान देतो त्या लोकांना माझ्यामुळे वाईट वाटलं असेल. माझं वागणं फार चुकीचं होतं," असं क्लार्क म्हणाला आहे.