INDvsENG TEST : पाचवा सामना असणार क्रीडाप्रेमींसाठी खास, दोन दिग्गजांची होणार 'ग्रेट भेट'

आपापल्या खेळातील दोन दिग्गजांच्या भेटीची चाहत्यांना जबरदस्त उत्सुकता आहे

Updated: Sep 8, 2021, 09:10 PM IST
INDvsENG TEST : पाचवा सामना असणार क्रीडाप्रेमींसाठी खास, दोन दिग्गजांची होणार 'ग्रेट भेट' title=

मुंबई : भारत आणि इंग्लंडदरम्यान (India vs England Test Series) खेळल्या जाणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. ओव्हल सामना जिंकत विराट सेनेनं यजमान इंग्लंडवर आघाडी घेतली आहे. आता पाचवा कसोटी सामना मँचेस्टरमध्ये (manchester) खेळवला जाणार आहे. हा सामना केवळ क्रिकेटप्रेमींसाठीच नाही तर जगभरातील क्रीडाप्रेंमींसाठी खास असणार आहे. (Virat Kohli to meet Cristiano Ronaldo After 5th Test in Manchester)

पाचवा कसोटी सामना संपल्यावर एक मोठा कार्यक्रम होणार असून संपूर्ण विश्वाचं लक्ष याकडे लागलेलं आहे. याचं कारणही तसंच आहे. सामना संपल्यानंतर क्रीडा जगतातील दोन दिग्गजांची ग्रेट भेट होणार आहे. क्रिकेट जगतातील रनमशिन विराट कोहली (Virat Kohli) फुटबॉलचा सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची (Cristiano Ronaldo) भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. मँचेस्टरमध्ये ही भेट होणार असल्याने चाहत्यांना मोठी पर्वणी असणार आहे.

ख्रिस्तियानो रोनाल्डाने नुकताच युव्हेंटस क्लबला अलविदा केला असून मँचेस्टर युनाटेडसोबत करार केला आहे. त्यामुळे इंग्लिश फुटबॉल प्रेमी आनंदात आहेत. सध्या रोनाल्डो मँचेस्टरमध्ये असून इथेच भारत आणि इंग्लंडदरम्यानचा पाचवा कसोटी सामना खेळवला जाणार आहे.

विराट कोहली आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोचे इंस्टाग्रामवर कोरोडो चाहते आहेत. कोहलीचे इंस्टाग्रामवर 150 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर सुपरस्टार रोनाल्डोचे 337 मिलिअन फॉलोअर्स आहेत. याआधी कोहली आणि रोनाल्डोने 2014 मध्ये एकमेकांशी ट्विटवरुन संवाद साधला होता. त्यामुळे या भेटीची सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा आहे.