IND vs ENG Ranchi Test : टीम इंडिया आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात रांचीमध्ये झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात रोहितसेनेने इंग्लंडला 5 विकेट्सने मात दिली. इंग्लंडच्या जो रूटच्या शतकावर ध्रुव जुरैल (Dhruv Jurel) आणि यशस्वी जयस्वालची खेळी भारी ठरली तर भारताच्या फिरकीपट्टूंनी पुन्हा एकदा आपल्या कर्तृत्वाची छाप रांचीच्या मैदानावर सोडली आहे. विराट, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांसारखे खेळाडून अनुपस्थित असताना देखील नव्या दमाच्या खेळाडूंनी मालिका खिशात घातल्याने आता जगभरात टीम इंडियाचं कौतूक होताना दिसतोय. अशातच आता क्रिकेटचा किंग विराट कोहली (Virat kohli) याने नव्या छाव्यांना शाबासकीची थाप दिली आहे.
काय म्हणतो विराट कोहली?
विराट कोहलीला मागील 15 तारखेला पुत्ररत्न प्राप्त झालं. त्यामुळे तो सध्या सुरू असलेल्या मालिकेत खेळत नाहीये. मात्र, सुट्टीवर असताना देखील विराट टीम इंडियाचा हिशोब ठेवतोय. मालिका विजयानंतर विराट कोहलीने ट्विट करत युवा खेळाडूंचं कौतूक केलंय. 'आमच्या युवा संघाने अभूतपूर्व मालिका जिंकली. धैर्य, दृढनिश्चय आणि लवचिकता दर्शविली', असं विराट कोहलीने म्हटलं आहे
इरफान पठाण म्हणतो....
रोहित शर्माच्या कर्णधारपदाचे नेहमीच मी कौतुक केलंय. विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांच्या अनुपस्थितीवर मात करून, पहिल्या डावात पिछाडीवर पडल्यानंतर आणि मालिका विजय मिळवणे हे त्याचे अपवादात्मक नेतृत्व आणि संघाची लवचिकता अधोरेखित करतं, असं म्हणत इरफान पठाणने टीम इंडियाचं कौतूक केलं आहे.
रांचीचं मैदान मारलं
चौथ्या कसोटीत भारतीय फिरकीपटूंनी कंबर कसून इंग्लंडच्या फलंदाजांचा कस काढला आहे. आर आश्विनने 5 तर कुलदीप यादवने 4 विकेट्स घेत इंग्लंडला कमी धावसंख्येत गुंडाळलं, तर भारतीय फलंदाजीमध्ये ध्रुव जुरैल, शुभमन गिल यांनी कमालीची कामगिरी करत भारताची इनिंग सावरली.
टीम इंडिया - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.
टीम इंग्लंड - बेन स्टोक्स (कर्णधार) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टले, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन आणि शोएब बशीर.