मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली आऊट ऑफ फॉर्म अजूनही कायम आहे. कारण इंग्लंडविरूद्धच्या टी20 विश्वचषकाच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या या सामन्यात विराट मोठी कामगिरी करण्यास अपयशी ठरला आहे. अवघ्या एका धावावर तो बाद झाला आहे. त्यामुळे आता इतका दिग्गज खेळाडू सतत अपयशी होत असल्याने आता त्याच्या टी20 विश्वचषकाच्या निवडीवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
इंग्लंडविरूद्धच्या टेस्ट सामन्यात विराट काही खास कामगिरी करू शकला नव्हता. टेस्ट नंतर आता त्याला टी20 सामन्यात संधी देण्यात आली होती. मात्र टी20 सामन्यात ही तो फ्लॉप ठरला आहे. 3 बॉल्समध्ये 1 धावा करून तो बाद झाला आहे. इंग्लंड संघातून पदार्पण करणाऱ्या रिचर्ड ग्लीसन या नवख्या गोलंदाजाचा शिकार विराट ठरलाय.
त्यामुळे विराटच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
पहिल्या टी20 सामन्यात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली होती. तर दुसऱ्या टी20त दिग्गज खेळाडूंचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये विराट कोहलीचं देखील नाव होतं. मात्र या टेस्टनंतर टी20 त देखील विराट फ्लॉप ठरल्याने त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
दरम्यान दुसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली होती. रोहित शर्मा आणि ऋषभ पंतने टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली होती. रोहीतने 31 तर ऋषभने 26 धावा ठोकल्या आहेत. या दोघांच्या विकेटनंतर भारतीय फलंदाजी गडगडली आहे. एका मागून एक फलंदाज विकेट देत पव्हेलियन गाठत आहेत. 14 व्या ओव्हरपर्यंत टीम इंडियाने शंभर धावा पुर्ण केल्या होत्या. आता टीम इंडिया किती धावांचा डोंगर उभारतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.