विराट कोहलीचे 'दुश्मन', हे दोन स्फोटक खेळाडू लवकरच टीम इंडियात त्याची जागा घेणार!

Virat Kohli Asia Cup 2022: विराट कोहलीसाठी आशिया कप 2022 खूप महत्वाचा असणार आहे. सध्या विराट कोहली हा बॅडपॅचमध्ये आहे. त्याच्या खराब फॉर्ममुळे तो टीम इंडियात आपले स्थान मिळवून ठेवू शकेल का, याबाबत शंका उपस्थित होऊ लागली आहे.  

Updated: Aug 24, 2022, 08:56 AM IST
विराट कोहलीचे 'दुश्मन', हे दोन स्फोटक खेळाडू लवकरच टीम इंडियात त्याची जागा घेणार! title=

मुंबई : Virat Kohli Asia Cup 2022: विराट कोहलीसाठी आशिया कप 2022 खूप महत्वाचा असणार आहे. सध्या विराट कोहली हा बॅडपॅचमध्ये आहे. त्याच्या खराब फॉर्ममुळे तो टीम इंडियात आपले स्थान मिळवून ठेवू शकेल का, याबाबत शंका उपस्थित होऊ लागली आहे. कारण दोन स्फोटक खेळाडू लवकरच टीम इंडियात आपली जागा मजबूत करण्यात शक्यता आहे. हे दोन्ही खेळाडू टीम इंडियात दाखल होऊ शकतात.

 विराट कोहलीसाठी आगामी काळ खूप कठिण असणार आहे. खराब फॉर्ममुळे टीम इंडियामध्ये स्वत:ला टिकवून ठेवण्याचे कठीण आव्हान असणार आहे. यावेळी संघातील अनेक खेळाडू विराट कोहलीला जोरदार टक्कर देत आहेत. आशिया चषक स्पर्धेतही विराट कोहली चांगला खेळला नाही, तर संघात त्याची जागा दोन खेळाडू जागा हिरावून घेऊ शकतात. 

कोहली याला मोठा धोका
 
विराट कोहली वनडे आणि टी-20 फॉरमॅटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. युवा स्फोटक फलंदाज शुभमन गिल याला झिम्बाब्वे दौऱ्यावर खेळण्याची संधी मिळाली. या संधीचा पुरेपूर फायदा घेत शुभमन गिलने टीम इंडियामध्ये आपली छाप सोडली आहे. शुभमन गिलने अलीकडच्या काळात मिळालेल्या संधींचा पुरेपूर फायदा घेतला आणि जोरदार बॅटिंग केली आहे. शुभमन गिलने झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेत सर्वाधिक धावा केल्या. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात शुभमन गिल याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत 97 चेंडूत 130 धावा केल्या होत्या. अशा स्थितीत आगामी काळात विराटची जागा घेण्यासाठी शुभमन गिल हा सर्वात मोठा दावेदार मानला जात आहे.

रोहितचा मित्रही विराटसाठी मोठा धोका

आयपीएलमध्ये रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली खेळलेला सूर्यकुमार यादवही विराट कोहलीसाठी मोठा धोका ठरत आहे. 360 डिग्रीच्या नावाने ओळखला जाणारा सूर्यकुमार यादव टीम इंडियाचा मुख्य खेळाडू बनला आहे.  सूर्यकुमार यादवनेही अनेक वेळा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. 2022 च्या आशिया कपमध्येही तो संघाचा एक भाग आहे. प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळवण्यासाठी सूर्यकुमार यादवलाही कर्णधारपदाची पहिली पसंती मिळणार आहे. 

विराट कोहलीचा खराब फॉर्म कायम  

विराट कोहली सध्या एवढ्या बॅडपॅचमधून जात आहे की, त्याला शतकापासून 30 धावांचा टप्पाही पार करता येत नाही. विराट कोहली याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक ठोकून बराच काळ लोटला आहे. तो अखेरचा इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाचा भाग बनला होता. 

इंग्लंडविरुद्धच्या एकाही सामन्यात विराट कोहली याच्या बॅटमधून एकही धाव निघालेली नाही. इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटीत त्याने दोन डावांत 31 धावा केल्या होत्या. T-20 मालिकेतील दोन सामन्यात फक्त 12 धावा करता आल्या. त्याचबरोबर एकदिवसीय सामन्यांच्या दोन डावात केवळ 33 धावांचे योगदान दिले. अशा स्थितीत विराटसाठी आता चांगल्या खेळाशिवाय गत्यंतर नाही.