मुंबई : भारताचा तरूण आणि धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीला ' रन मशीन' म्हणून ओळखले जाते.
दिवसेंदिवस क्रिकेट खेळातील अनेक विक्रम मोडीत काढत विराट कोहली नवे विक्रम रचत आहे. त्यामुळे 'रन मशीन' हे नाव त्याला अगदी चपखल बसले आहे.
विराट कोहलीचे खेळातील सातत्य पाहून तो सचिन तेंडुलकर्, सुनील गावस्कर अशा भारतीय दिग्गज क्रिकेटर्सचे अनेक विक्रम मोडतोय हे आपण पाहिलं आहे. पण आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही नवे विक्रम रचण्यासाठी विराट सज्ज झाला आहे.
नागपूर टेस्टमध्ये श्रीलंकेविरूद्ध खेळताना विराटने दुसर्या दिवशी दुहेरी शतक झळकवले आहे. हे विराट कोहलीचे पाचवे दुहेरी शतक आहे. या शतकामुळे डॉन ब्रॅडमॅनचा विक्रम मोडीत निघाला आहे.
कमीत कमी वेळात पाचवे दुहेरी शतक ठोकण्याचा मान सर ब्रॅडमन यांच्या नावावर होता. त्यांनी ही कमाल दोनदा केली आहे.
पहिल्यांदा ५७० दिवसांमध्ये तर दुसर्यांदा ५१५ दिवसांमध्ये त्यांनी दुहेरी शतक ठोकलं होते. पण विराट कोहलीने दुहेरी शतक ठोकण्याची कमाल ४९२ दिवसांतच करून दाखवला आहे.
विराटने पहिल्यांदा २०१६साली वेस्टइंडिजमध्ये पहिल्यांदा दुहेरी शतक ठोकले होते. तर दुसरे दुहेरी शतक २६ नोव्हेंबर २०१७ साली नागपुरात ठोकले आहे. या दुहेरी शतकांच्या विक्रमामध्ये राहुल द्रविड आणि कुमार संघकारा या क्रिकेटर्सचाही समावेश आहे.
492 दिवस विराट कोहली (1-5 ) दुहेरी शतक
515 दिवस डॉन ब्रॅडमन (1-5 दुहेरी शतक)
570 दिवस डॉन ब्रॅडमन (2-6 दुहेरी शतक)
1153 दिवस कुमार संगाकारा (2-6 दुहेरी शतक)
1241 दिवस राहुल द्रविड़ (1-5 दुहेरी शतक)