मैदानावर पुन्हा एकदा पाहायला मिळाला जुना विराट कोहली (व्हिडिओ)

भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावरून विजय मिळवून स्वदेशी पोहचत आहेत. टेस्ट आणि वन डेमध्ये श्रीलंकेचा सुपडा साफ केल्यानंतर बुधवारी खेळल्या गेलेल्या एक मात्र टी २० मध्ये असलेल्या श्रीलंकेला सात विकेट राखून शिकस्त दिली.

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Sep 7, 2017, 07:39 PM IST
मैदानावर पुन्हा एकदा पाहायला मिळाला जुना विराट कोहली (व्हिडिओ)  title=

नवी दिल्ली : भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावरून विजय मिळवला आहे. टेस्ट आणि वन डेमध्ये श्रीलंकेचा सुपडा साफ केल्यानंतर बुधवारी खेळल्या गेलेल्या एकमात्र टी २० मध्ये असलेल्या श्रीलंकेला सात विकेट राखून मात दिली.

या खेळात पुन्हा एकदा कॅप्टन विराट कोहलीचं जुनं रूप आपल्याला पाहायला मिळालं. या सामन्यात १७१ धावांचा पाठलाग करत असताना भारताने तीन विकेट गमावून सामना जिंकला. मात्र या मॅचमध्ये अंपायरने एक भयंकर मोठी चूक केली. श्रीलंका १५ व्या ओव्हरमध्ये खेळत होती. अक्षर पटेल बॉलिंग करत होता. समोर बॅटिंगसाठी सीककूग प्रसन्ना असताना या ओवरमध्ये तिसऱ्या बॉलमध्ये अगदी स्पष्ट दिसलं की प्रसन्नाच्या बॅटला बॉल लागून अगदी सरळ धोनीच्या गल्व्समध्ये गेला. 

हे होताच कोहली आणि धोनी तसेच टीम इंडियाचे सर्व प्लेअर्स आऊटची मागणी करू लागले. मात्र अंपायरवर कोणताही परिणाम झाला नाही. त्याने सरळ नॉट आऊट दिलं. त्यानंतर अक्षरने देखील जोरात अपील केलं मात्र त्याला देखील अंपायरने नकार दिला. 

विराट कोहली यावेळी प्रचंड भडकला आणि त्याचा तो राग कॅमेऱ्यात कैद झाला. रिप्लेमध्ये देखील अगदी स्पष्ट दिसलं की प्रसन्नाच्या बॅटला अगदी सहज बॉल टच झाला होता. मात्र त्याला जीवनदान मिळालं.