Sindhudurg Rajkot Fort Shivaji Maharaj Statue : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोट किल्ल्यावर (Rajkot Fort) नव्याने उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chatrapati Shivaji Maharaj) 35 फुटी पुर्णाकृती पुतळा अवघ्या 8 महिन्यांत कोसळला. 26 ऑगस्ट 2024 रोजी पुतळा कोसळला आणि शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली. 4 डिसेंबर 2023 रोजी मालवणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं. ता चौकशी समितीनं याप्रकरणी 16 पानी अहवाल सादर केला. यात पुतळा कोसळण्यामागे धक्कादयक माहिती समोर आलेय.
मालवणजवळच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली.. मात्र शिवरायांचा पुतळा कोसळण्यामागची कारणं ऐकाल तर शिवप्रेमींच्या तळपायाची आग मस्तकात जाईल.. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला काही ठिकाणी गंज चढला होता. शिवरायांच्या पुतळ्याची फ्रेम कवकुवत होती. वेल्डिंग चुकीच्या पद्धतीने करण्यात आलं होतं. हे विरोधकांचे आरोप नाहीत तर चौकशी समितीच्या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आलीय.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याची योग्य पद्धतीने देखभाल करण्यात आली नाही
पुतळ्याला काही ठिकाणी गंज चढला होता
पुतळ्याची फ्रेम कमकुवत होती
चुकीच्या वेल्डिंगमुळे पुतळा कोसळला
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची डिझाईन योग्य पद्धतीने बनवली नव्हती, असं अहवालात म्हटलंय
चौकशी अहवालानंतर आता निलेश राणे आणि वैभव नाईकांमध्ये जुंपली आहे. याच कारणासाठी वैभव नाईकांनी चौकशीला बोलावल्याचा आरोप निलेश राणेंनी केलाय. तर आम्ही भ्रष्टाचार बाहेर काढल्यामुळेच आम्हाला पोलीस नोटीस देत असल्याचं प्रत्युत्तर वैभव नाईकांनी दिलंय.
शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्यानंतर राज्यात राजकारण रंगलं होतं.. पुतळ्याच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. आता चौकशी समितीच्या अहवालातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. त्यामुळं पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे.