Virat Kohli : '...तर मी आज टीम इंडियामध्ये नसतो', चिमुकल्याच्या DM वर विराटने मन जिंकलं राव; पाहा Video

Virat Kohli Viral Video : आगामी वर्ल्ड कपपूर्वी (World Cup 2023) सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झालाय. यामध्ये विराट कोहली एका चुमकल्याला मदत करताना दिसतोय. नेमकं प्रकरण काय आहे? पाहुया...  

Updated: Sep 20, 2023, 10:55 PM IST
Virat Kohli : '...तर मी आज टीम इंडियामध्ये नसतो', चिमुकल्याच्या DM वर विराटने मन जिंकलं राव; पाहा Video title=
Virat Kohli, Viral Video,

Virat Kohli, World Cup 2023 : येत्या 2 आठवड्यात क्रिकेटचा महाकुंभ असलेल्या वर्ल्ड कपला (World Cup 2023) सुरूवात होणार आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने 5 ऑक्टोबर रोजी वर्ल्ड कपचा श्रीगणेशा होईल. तर टीम इंडियाचा सामना 8 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध (IND vs AUS) सलामीचा सामना खेळेल. व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये टीम इंडियाच्या फलंदाजीचा भार विराट कोहलीच्या खांद्यावर असणार आहे. आशिया कपमध्ये विराटने पुन्हा स्वत:ला सिद्ध केलंय. त्यामुळे आता विराटवर टीम इंडियाच्या आशा आहेत. अशातच वर्ल्ड कपपूर्वी विराट कोहलीने मन जिंकलंय. विराट कोहलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे. विराटने नेमकं काय केलंय? पाहुया...

सध्या स्टार स्पोटर्सची (Star Sports Advt) एक जाहिरात तुफान व्हायरल होत आहे. विराट कोहलीसोबत ही जाहिरात शुट करण्यात आली आहे. लहान मुलांना खेळण्यास प्रेरित करावं, असा यामागील उद्देश आहे. सध्या ही अॅड ट्रेंजमध्ये असल्याचं दिसतंय. नेमकं विराटने काय केलं? पाहा... 

स्टार स्पोटर्सची जाहिरातीमध्ये विराट कोहली कारमधून प्रवास करत असतो. त्यावेळी त्याला एका चिमुकल्याचा मॅसेज येतो. त्यात त्याने म्हटलेलं असतं की, आम्ही दररोज क्रिकेट खेळण्याचा 'प्रयत्न' करतो, पण सोसायटीमधले काका काकू आम्हाला खेळू देत नाहीत. त्यावर विराटने आपल्या चिमुकल्या चाहत्याची मदत करण्याचं ठरवलं. विराटने गाडी थेट सोसायटीकडे वळवली अन् चिमुकल्याची भेट घेतली. त्यावेळी चिल्ल्यापिल्यांनी तिथं घोळका घातला. विराटने क्रिकेट खेळायला सुरूवात केली. एका पठ्ठ्यानं बॉल एका काकूच्या घराकडं टोलवला. त्यावेळी काकू बॉल देणार नाही, असं मुलांनी म्हणताच विराट  बॉल आणण्यासाठी जातो अन्...

आणखी वाचा - मिस यू पप्पा! वडिलांच्या आठवणीत सिराज झाला भावूक; इंस्टाग्राम स्टोरी चर्चेत

बॉल आणण्यासाठी गेलेल्या विराटला पाहून काकू देखील शॉक होतात. त्यावेळी विराट समजवतो की, मला एखाद्याने बॉल दिला नसला तर आज मी टीम इंडियामध्ये खेळलो नसतो. मुलांना खेळू द्या. त्यानंतर विराट बॉल घेऊन पुन्हा मुलांसह सोसायटीमध्ये खेळायला सुरूवात करतो. मुलांना खेळण्यापासून रोखू नका. त्यांना खेळू द्या, असा सल्ला विराटने यावेळी दिलाय.ॉ

पाहा Video

दरम्यान, सध्याच्या सिमेंटच्या वाढत्या जंगलामुळे ना मैदान उरलीत ना खेळ. ऑनलाईनच्या काळात लहान मुलं खेळणं विसरली आहेत. तर अनेक मैदानी खेळ देखील गावापुरते मर्यादित राहिले आहेत. मुलांनी मैदानात यावं अन् मनसोक्त खेळावं.. कधी ठोपरं फोडून घ्यावं तर कधी विजयाची ट्रॉफी घेऊन यावं. पण खेळ कधी सोडू नये.. कोणताही खेळ तुम्हाला तल्लख बनवतो. त्यामुळे ऑनलाईन गेम खेळून नैराश्याच्या आहारी जाण्यापैक्षा मैदानी खेळ खेळून भिनधास्त बागडणं कधीही चांगलं.