नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा माजी तेजतर्रार बॉलर ब्रेट ली किती ग्रेट खेळाडू आहे हे तुम्हाला काही सांगायला नको... पण, ब्रेट लीचा मुलगा मात्र वडिलांचा नाही तर एका भारतीय खेळाडूचा मोठ्ठा फॅन आहे.
हा भारतीय खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आहे. ब्रेट लीच्या म्हणण्यानुसार, विराट कोहली माझ्या १० वर्षांच्या मुलाचा फेव्हरेस्ट बॅटसमन आहे. जेव्हा मी ही गोष्ट विराटला सांगितली.. तेव्हा विराटनं पुढे येऊन शुभेच्छांसह टीम इंडियाच्या एका शर्टवर सही असलेला टी शर्ट माझ्या मुलाला गिफ्ट केला.
उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वीही ब्रेट लीनं एका मुलाखतीत, विराटला थोडं हळूवार खेळण्याची विनंती करतो... कारण तो खूप ताकदवान खेळाडू आहे. तो जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा रन्सचा पाऊस पडतो. ३६० डिग्रीमध्ये शॉटस लगावण्याची क्षमता त्याच्यात आहे, असं म्हणत कोहलीची तोंड भरून स्तुती केली होती.
विराट एक शानदार खेळाडू आहे. आपली बॅटिंग आणि आपला राग या दोहोंवर नियंत्रण मिळवण्याची त्यात क्षमता आहे. ज्या अंदाजात तो क्रिकेट खेळतो तो मला खूप आवडतो. उत्साह असणाऱ्या खेळाडूंपैंकी तो एक आहे. सध्या माझ्या नजरेत जगभरातील सर्वात उत्कृष्ठ खेळाडुंपैंकी विराट एक आहे.