विराट कोहलीसाठी त्याच्या चाहत्याने रक्ताने लिहिले लव्ह लेटर

क्रिकेटच्या दुनियेत सध्याच्या घडीला भारताचा कर्णधार विराट कोहली सर्वाधिक फॅन फॉलोइंग असणारा क्रिकेटर आहे. 

Updated: May 3, 2018, 04:42 PM IST
विराट कोहलीसाठी त्याच्या चाहत्याने रक्ताने लिहिले लव्ह लेटर title=

मुंबई : क्रिकेटच्या दुनियेत सध्याच्या घडीला भारताचा कर्णधार विराट कोहली सर्वाधिक फॅन फॉलोइंग असणारा क्रिकेटर आहे. देशातच नव्हे तर जगभरात त्याच्या चाहत्यांची संख्या काही कमी नाहीये. यात सर्वाधिक फिमेल फॉलोइंग आहेत. विराटसाठी हे चाहते काय करतील यांची कोणी कधी कल्पनाही करु शकत नाही. याआधी विराटला इंग्लंडच्या एका महिला क्रिकेटरने प्रपोज केले होते. मात्र आम्ही बोलतोय विराटच्या अशा क्रेझी फॅन्सबद्दल जे विराटसाठी काहीही करु शकतात.विराटचा असाच एक फॅन आहे ज्याने विराटसाठी रक्ताने लव्ह लेटर लिहिले. खुद्द कर्णधाराने एका मुलाखतीत ही गोष्ट सांगितली. 

विराट कोहलीने इरॉस नॉऊला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला होता. काही दिवसांपूर्वी मी दिल्लीला गेलो होतो त्यावेळी मला रक्ताने लिहिलेले लव्ह लेटर मिळाले. कोहली म्हणाला, एकदा मी कारने चाललो होतो. त्यावेळी कोणीतरी ऑटोग्राफसाठी काचेतून हात घातला आणि एक कागद माझ्या हातात दिला आणि गायब झाला. त्यावर नाव लिहिले होते. मी ते लेटर लगेचच सुरक्षारक्षकांकडे सोपवले. हे खूप भितीदायक होते.

विराट कोहली सध्या आयपीएलमध्ये बिझी आहे. त्याचा संघ तितकीशी चांगली कामगिरी करत नाहीये. गेल्या सामन्यात त्यांनी मुंबईला हरवले होते.