विराटला भेटण्यासाठी सुरक्षा भेदून फॅन मैदानात

 हा चाहता विराटचं शतक पूर्ण होताच त्याच्याकडे धावत आला. मात्र सुरक्षारक्षकांनी त्याला विराटपर्यंत पोहोचण्यापूर्वीच थांबवलं.

Updated: Oct 30, 2017, 12:06 AM IST
 विराटला भेटण्यासाठी सुरक्षा भेदून फॅन मैदानात title=

कानपूर : एक फॅन सुरक्षा भेदून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला भेटण्यासाठी मैदानात उतरला. हा चाहता विराटचं शतक पूर्ण होताच त्याच्याकडे धावत आला. मात्र सुरक्षारक्षकांनी त्याला विराटपर्यंत पोहोचण्यापूर्वीच थांबवलं

या घटनेनंतर काही काळासाठी खेळही थांबवण्यात आला होता. कानपूर वन डेत विराटने शतक पूर्ण करताच या चाहत्याने मैदानात धाव घेतली. छायाचित्रकार बसलेल्या मीडिया गॅलरीतून एक चाहता विराटच्या नावाची जर्सी आणि तिरंगा घेऊन मैदानात उतरला. मात्र या प्रसंगानंतर पुढच्याच चेंडूला हार्दिक पंड्या बाद झाला. 

विराटचं वन डे सामन्यांच्या कारकीर्दीतलं हे 32 वं शतक ठरलं. विराट कोहलीने 106 चेंडूंमधली 113 धावांची खेळी 9 चौकार आणि 1 षटकारानं पूर्ण केली. विराटने वन डे सामन्यांमधल्या 9 हजार धावांचा टप्पाही आज ओलांडला हे विशेष.

टीम इंडियाचा वन डे सामन्यांमधला हा सलग 7 मालिकाविजय ठरला. टीम इंडियाने कानपूर वन डेत न्यूझीलंडवर 6 विकेट्स राखून विजय मिळवला. भारताने या विजयासह 3 वन डे सामन्यांची मालिकाही 2-1 ने जिंकली.