Gautam Gambhir On Virat Kohli: यंदाच्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये वनडे वर्ल्ड कप (ODI World Cup 2023) खेळवला जाणार आहे. हा वर्ल्ड कप भारतात होणार असल्याने आता 12 वर्षानंतर भारत पुन्हा वर्ल्ड कप मायदेशात जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. आगामी वर्ल्ड कपच्या दृष्टीकोनातून बीसीसीआयने (BCCI) 20 खेळाडूंना शॉर्टलिस्ट केलं आहे. मात्र, त्यांनी नावं अद्याप समोर आलेली नाहीत. त्यामुळे आता 20 खेळाडू कोण?, असा सवाल उपस्थित होतोय. अशातच आता टीम इंडियाचा (Team India) माजी स्टार सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने (Gautam Gambhir) मोठं वक्तव्य केलंय.
निडरवृत्तीने खेळणाऱ्या तुम्हाला सर्वप्रथम निवडावं लागेल तसेच 50 ओव्हर खेळण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे खेळाडू निवडावे लागतील. असे खेळाडू जे तुमचा खेळ योग्य पद्धतीने सांभाळू शकतात. आजकाल रिव्हर्स स्विंग (Reverse swing) पहायला मिळत नाही. त्यामुळे तुम्ही फिंगर स्पिनर गोलंदाजाकडे लक्ष देत नाही, असं गंभीर (Gautam Gambhir On Team India) म्हणाला.
तुम्ही विराट कोहलीला (Virat Kohli) सुर्यकुमारसारखी (Suryakumar Yadav) फलंदाजी कर, असं सांगू शकत नाही. मी स्वत: युसूफ पठाण (Yusuf Pathan) सारखं खेळू शकत नाही. तसेच युसुफ माझ्यासारखं खेळू शकत नाही. त्यामुळे खेळाडूची योग्य ओळख करणं गरजेचं असतं. जर तुम्ही सुर्याला सांगितलं विराट सारखा खेळ तर त्याला देखील जमणार नाही, असंही गौतम गंभीर (Gautam Gambhir On Virat Kohli) म्हणाला आहे.
आणखी वाचा - Shah Rukh Khan: "तो फायटर आहे, इंशाअल्लाह लवकरच...", ऋषभ पंतसाठी किंग खानने मागितली दुआ!
दरम्यान, टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) नेतृत्वात 2011 ला भारतानं दुसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक (2011 ODI World Cup) जिंकला होता. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy) जिंकली होती. तेव्हापासून भारताला आयसीसीची कोणतीही ट्रॉफी जिंकता आली नाही. त्यामुळे आता भारताकडे सुवर्णसंधी चालून आली आहे.