IND vs WI: विराट कोहली पुन्हा होणार कॅप्टन? टीम इंडियाच्या माजी चीफ सिलेक्टरच्या वक्तव्याने खळबळ!

MSK Prasad On Virat Kohli: रोहितनंतर शुभमन गिलचं नाव समोर येत असल्याने आता अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. अशातच आता टीम इंडियाचे (Team India New Captain) माजी चीफ सिलेक्टर एमएसके प्रसाद यांनी त्यांच्या एका वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे.

Updated: Jul 10, 2023, 06:06 PM IST
IND vs WI: विराट कोहली पुन्हा होणार कॅप्टन? टीम इंडियाच्या माजी चीफ सिलेक्टरच्या वक्तव्याने खळबळ! title=
Virat Kohli can be an option for test captaincy Former selector MSK Prasad Clearly expressed opinion

Virat Kohli Test Captaincy: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल (WTC Final 2023) सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा दारूण पराभव केला. टीम इंडियाने चांगली कामगिरी करता आली नसल्यानं भारतीय संघावर जोरदार टीका होताना दिसत होती. तर रोहितने कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा, अशा मागणीने देखील जोर धरला होता. अशातच रोहितनंतर कोण? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे. रोहिचनंतर शुभमन गिलचं नाव समोर येत असल्याने आता अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. अशातच आता टीम इंडियाचे (Team India New Captain) माजी चीफ सिलेक्टर एमएसके प्रसाद यांनी त्यांच्या एका वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे.

विराट कोहलीने (Virat Kohli) जानेवारी 2022 मध्ये कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. पण आता भारताच्या माजी चीफ सिलेक्टर यांनी पुन्हा एकदा विराटला कसोटी संघाचा कर्णधार बनवण्याच्या मुद्द्यावरून मोठं वक्तव्य केलंय. रोहित शर्मानंतर कोणत्या खेळाडूला संघाची जबाबदारी द्यायला हवी, असं सवाल विचारला गेल्यावर प्रसाद यांनी आक्रमकपणे आपलं मत मांडलं. 

काय म्हणाले MSK Prasad?

विराटचं नाव का घेतलं जात नाही. जेव्हा अजिंक्य रहाणे पुनरागमन करून उपकर्णधार होऊ शकतो तर विराट कोहली का नाही? कर्णधारपदाबद्दल विराटची मानसिकता काय आहे हे मला माहीत नाही. जर सिलेक्टर्स रोहितच्या पुढे विचार करत असतील. जरी, विराट विचार करत आहे की नाही हे मला माहित नाही, परंतु जर तो रोहितच्या पुढे विचार करत असेल तर मला वाटतं की विराट (Virat Kohli Test Captaincy) देखील एक पर्याय असू शकतो, असा विश्वास एमएसके प्रसाद यांनी व्यक्त केला आहे.

वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी कसोटी संघ 

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड़, विराट कोहली, यशस्वी जयसवाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनादकट, नवदीप सैनी.

वेस्ट इंडीज दौऱ्याचं टाईमटेबल

12 ते 16 जुलै 2023 : पहिला कसोटी सामना
ठिकाण : विंडसर पार्क, डोमिनिका

20 ते 24 जुलै 2023 : दुसरा कसोटी सामना 
ठिकाण : क्विन्स पार्क ओव्हल पोर्ट , त्रिनिदाद