नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटचे खेळाडूच भारतातील खेळ जगतातील एक चेहरा बनले आहेत. क्रिकेटरने दिलेला एखादा सल्ला देखील आजची पिढी विचार पूर्वक ऐकते.
असाच एक सल्ला आणि खंत कॅप्टन विराट कोहलीने एका कार्यक्रमात व्यक्त केली आहे. ही खंत आहे आजच्या तरूण पिढीबद्दल. विराट कोहली आता युवकांचा आणि लहान मुलांचा रोल मॉडेल आहे. मुलं आता त्याला आपला आदर्श मानतात आणि तरूणांना अगदी विराट कोहलीप्रमाणे बनायचं आहे. लाखो युवा तरूण कोहलीला सोशल मीडियावर फॉलो करतात. मात्र कोहलीला आपल्या या युवा फॅन्सची एक गोष्ट अजिबात पसंद नाही. हल्लीच एका कार्यक्रमात विराट कोहलीने आपल्याला आजच्या तरूण पिढीची कोणती गोष्ट आवडत नाही हे स्पष्ट केलं आहे.
जी बोंब सगळ्या पालकांची आहे तिच बोंब विराट कोहलीने मारली आहे. विराट कोहली म्हणतो, आज कालची मुलं घराबाहेर पडतंच नाहीत. कोणतीही फिजिकल अॅक्टिविटी आजची तरूणाई करतच नाही. ही मुलं आपला सर्वाधिक वेळ हा इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सवर अधिक घालवतात. स्मार्टफोन, आयपॅडमध्ये अधिक गुंतलेली मुलं आम्ही पाहिली आहेत. मी मैदान आणि गल्लीमध्ये खेळत मोठा झालो आहे. त्यामुळे तरूणाईने याकडे थोडं लक्ष द्यावं असं त्याने सांगितलं आहे.
रेडिओ कॉमेंट्रीपासून क्रिकेटचा सुरू झालेला प्रवास आता टेलिव्हिजनपर्यंत पोहोचला आहे. सर्वात पहिला हिरो सुनील गावस्करपासून ते आता कपिल देव आणि आता सचिन तेंडुलकरपर्यंत पोहोचला आहे. २००७ मध्ये महेंद्र सिंह धोनीने ही धुरा सांभाळली आता याचा हिरो आहे कॅप्टन विराट कोहली हिरो आहे. विराट कोहली आता करोडो लोकांच्या मनाची धडकन आहे. आपल्याला माहितच आहे विराटच्या फॅनमध्ये युवकांची संख्या जास्त आहे.