विरुष्कासोबतच्या वादात अरहान खरंच कोर्टाची पायरी चढणार?

विरुष्का आणि अरहान सिंह यांच्यातला वाद आता थेट न्यायालयात जाण्याची शक्याता आहे.

Updated: Jun 26, 2018, 10:03 AM IST

मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्मा, क्रिकेटपटू विराट कोहली आणि अरहान सिंह यांच्यातला वाद आता थेट न्यायालयात जाण्याची शक्याता आहे. धावत्या गाडीतून रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या अरहान सिंहला काही दिवसांपूर्वी अनुष्कानं सुनावलं होतं. तो व्हिडीओ विराटने ट्विट केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. मात्र अरहानला हा प्रकार रुचला नाही. या विरोधात अरहानने विराट-अनुष्काला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. दरम्यान ही नोटीस कायदेशीर असली तरी त्याला गांभीर्यानं घेण्याची गरज नसल्याचं मत कायदेतज्ज्ञांनी मांडलंय. तर कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर आता अरहान खरंच कोर्टाची पायरी चढतो का हे पाहावं लागेल.