'हा' आहे विराट अनुष्काचा नवा बिजनेस...

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांचे नाते काही जगापासून लपलेले नाही. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 19, 2017, 03:34 PM IST
'हा' आहे विराट अनुष्काचा नवा बिजनेस...  title=
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांचे नाते काही जगापासून लपलेले नाही. त्यांच्या जोडीचा असा खास चाहतावर्ग आहे. अनेकदा काही ना काही गोष्टीला घेऊन ते चर्चेत असतात. मात्र आता या दोघांबद्दल वेगळीच गोष्ट समोर आली आहे. 

मुंबई मिररच्या वृत्तानुसार हे दोघे प्रॉपर्टीमध्ये एकत्र पैसे गुंतवत आहेत. इतकेच नाही तर दोघांनी मुंबईतल्या एका प्रॉपर्टीमध्ये पैसे सुद्धा गुंतवले आहेत. अनुष्का आणि विराटने दिल्लीत देखील जागा खरेदी केली आहे. 

आता हे वाचून तुम्हाला वाटले असेल की दोघे लवकरच  लग्न करणार आहेत. पण असे काही नाही. इतक्यात तरी त्यांचा लग्नाचा विचार नाही आहे. दोघांनी विकत घेतलेल्या जागेवर रेस्टोरंट चालू करण्याचा त्यांचा विचार आहे. लवकरच त्यांच्या या नव्या रेस्टोरंटचे कामदेखील सुरु होणार असल्याचे समजते.